Daily Lokamat -6/11/2011
'स्नेहालया'मध्ये वात्सल्य आणि मातृत्वाची अनुभूती |
अहमदनगर। दि. ६ ( प्रतिनिधी) लालबत्ती भागातील बालके, एच.आय.व्ही. बाधित तसेच हक्क वंचित बालकांना स्नेहालय संस्थेच्या सर्वप्रकल्पात वात्सल्य आणि मातृत्वाची अनुभूती मिळतेअसे प्रतिपादन अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले. सिंधुताई तसेच त्यांचे मानसपुत्र विनय यांनी स्नेहालयाच्या विविध प्रकल्पांना तसेच अनाम प्रेमच्या अंध मुलांच्या पुनवर्सन प्रकल्पास नुकतीच भेट दिली. प्रकल्पातील बालकांशी आणि काळजीवाहकांशी माईंनी संवाद केला. यावेळी श्रीमती सपक ाळ यांचा स्नेहालय परिवाराने मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब दुशिंग यांच्या हस्ते गौरव केला. श्रीमती सपकाळम्हणाल्या, बदलत्या परिस्थितीत हक्क वंचित आणिअनाथ मुलांसाठी अनेक माइर्ंची गरज पडणार आहे. स्नेहालय संस्थेत कोणीही बालकांसाठी काम करू शकतो. स्नेहालयाचा हा खुलेपणा आणिपारदर्शकता बालसेवी संस्थांसाठी अनुकरणीय असल्याचे त्या म्हणाल्या. हनिफ शेख यांनी प्रास्ताविक केले तर प्रवीण मुत्याल यांनी आभार मानले. सर्वश्री अजय वाबळे, अजित माने, अशोक मुळे, अनंत कुलकर्णी, अनुपमा भापकर, मंगेश जोंधळे, डॉ. स्मिता खोजे, रूपाली देशमुख यांनी सपकाळयांच्या भेटीचे नियोजन केले. |
No comments:
Post a Comment