Monday, 19 December 2011

Snehalaya Award Ceremony

 Dated 19/12/2011

नगरपालिका निवडणुकीत
भाजपच्या जागा वाढल्या
आमदार देवेंद्र फडणवीस यांचा दावा

राजू शेख दिवंगत संसदपटू प्रा. मधू दंडवते यांच्या स्मरणार्थ स्नेहालय संस्थेतर्फे दिला जाणारा कर्तव्यशील लोकप्रतिनिधी पुरस्कार आमदार देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करताना प्रकाश आंबेडकर./ इतर छायाचित्रे व वृत्त हॅलो नगर ३वर अहमदनगर। दि. १८ (प्रतिनिधी)
राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगली प्रगती केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने अत्यंत अनिर्बंधपणे पैशाचा वापर केल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीला जरी निवडणुकीत यश मिळाले असले तरी भाजपच्या जागा वाढल्या आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मागील नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या ६७९ जागा होत्या. त्या वाढून आज ८00 पर्यंत झाल्या आहेत. मागील निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेला भाजपा आज तिसर्‍या क्रमांकावर आला आहे असे ते म्हणाले. येथील स्नेहालय संस्थेचा 'कर्तव्यशील लोकप्रतिनिधी पुरस्कार' आज फडणवीस यांना प्रदान करण्यात आला. या समारंभासाठी आज ते नगरला आले असता त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वरील प्रतिपादन केले.
यावेळी सदा देवगांवकर, प्रा. भानुदास बेरड, बाबासाहेब वाकळे, जगन्नाथ निंबाळकर, विनोद बोथरा, श्याम पिंपळे, बाळासाहेब पोटघन, मालनताई ढोणे, सचिन पारखी, शिवाजी लोंढे, दत्ता कावरे, बाळासाहेब गायकवाड, विनोद भिंगारे, आबा गुंड, प्रवीण ढोणे, डॉ. अमरजा रेखी, सुप्रिया जानवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आमदार फडणवीस म्हणाले, कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळेच भाजपाचे काम वाढत आहे. दोन्ही काँग्रेस पैसे वाटून करीत असलेल्या निवडणुका या लोकशाहीस घातक आहेत. पण पैसा हा सर्वस्व नाही. हे खडकवासला निवडणुकीतील निकालाने दाखवून दिले आहे.
आता येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन त्यांची कामे करावीत. केवळ प्लेक्स बोर्डवरचे कार्यकर्तेन होता खर्‍या अर्थाने तळमळीने पक्षाचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले.



स्नेहालय संस्थेच्यावतीने मिळालेले वार्षिक पुरस्कार प्रकाशआंबेडकर यांच्या हस्ते स्वीकारताना डावीकडून अँड. शाम असावा, जयप्रकाश दशपुत्रे, शाम पिंपळखरे, आमदार देवेद्र फडणवीस, संतोषगर्जे, जयताई जोगदंड, जयश्री शिंदे, लता जोशी, शुभा बेंन्नोरवार, राजू शेख

No comments:

Post a Comment