Monday, 19 December 2011

Snehalaya Award Ceremony


Snehalaya Award Ceremony 2011

Deshdoot. 16/12/2011


Lokamat 16/12/2011
फडणवीस, आसावा, शिंदे, पिंपळखरे, जोशी, गोखले पुरस्काराचे मानकरी
स्नेहालयचे पुरस्कार जाहीर
श्याम आसावा जयाताई जोगदंड देवेंद्र फडणवीस जयश्री शिंदे संतोष गज्रे अहमदनगर | दि. १५ (प्रतिनिधी)
येथील स्नेहालय संस्थेतर्फे विविध सामाजिक विषयात कार्य करणार्‍या सर्मपित कार्यकर्त्यांना देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी आमदार देवेंद्र फडणवीस, शुभा बेन्नुरवार, वीणा गोखले, अण्णांचे कार्यकर्ते अँड. शाम असावा, विजयाताई लवाटे, संतोष गज्रे, वीणा गोखले, लता जोशी, जयाताई जोगदंड, जयश्री शिंदे यांना जाहीर झाला आहे.
स्नेहालय ही संस्था एड्सग्रस्त व वंचितांसाठी काम करते. सामाजिक कार्यकर्ते व माजी प्राचार्य मामासाहेब कौडिन्य यांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था दरवर्षी सामाजिक पुरस्कार देते. यंदा या पुरस्कारांचे अकरावे वर्ष आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीत काम करणार्‍या अँड. श्याम आसावा यांना अण्णा हजारे जनसंघर्ष पुरस्कार जाहीर झाला आहे. नवृत्तीनंतर वंचितांसाठी अध्यापन करणारे जयप्रकाश दशपुत्रे यांचाही गौरव केला जाणार आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते व युआरएल फाऊंडेशनचे संस्थापक उदय लाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी(दि.१८) सकाळी १0:३0 वाजता नगर औद्योगिक वसाहतीमध्ये स्नेहालय पुनर्वसन संकुलात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

No comments:

Post a Comment