Monday, 19 December 2011

Pune Award

Sakal 19/12/2011

उपेक्षेचे बळी ठरलेल्यांच्या मागे उभे राहणाऱ्यांची गरज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 19, 2011 AT 01:00 AM (IST)
पुणे - समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचे हजारो हात पुढे येतात; परंतु याच उपेक्षेचे बळी ठरलेल्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पायांचीही गरज असते, असे मत नगर येथील "स्नेहालय'चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

"आशय सांस्कृतिक आणि परांजपे स्किम्स्‌' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "पुलोत्सव तरुणाई'त "स्नेहालय'चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांना समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते "पुलोत्सव कृतज्ञता सन्माना'ने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गिरीश कुलकर्णी बोलत होते. व्यासपीठावर "पुलोत्सवा'चे सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारामुळे वेदनांनी भरलेल्या समाजासाठी केलेल्या कामाला समाजमान्यता मिळाल्याची भावना गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ""समाजाची संवेदना हरवत आहे. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली नसल्याची पांढरपेशा वर्गाची भावना होत आहे. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही. त्यासाठी मदतीच्या हातासोबतच उपेक्षेमुळे उद्‌ध्वस्त झालेल्या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समाजाची आज खऱ्याअर्थाने गरज आहे. त्यासाठी तरुणांनी आत्मप्रेरणेने पुढे यावे.'' या वेळी कुलकर्णी यांनी एचआयव्हीग्रस्तांचे "उभे' केलेले जीवन ऐकवून उपस्थितांना अंतर्मुख व्हायला लावले.

समाजाची तरलता हरवत असून, मानसिकता विकृत होत असल्याचे गिरीश प्रभुणे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""केवळ पैशाने समस्या सुटत नाहीत; तर उमेदीच्या काळात समाजाने वेळ देण्याची गरज आहे. मूक-बधिर विद्यार्थ्यांना वेगळ्या शाळेत शिक्षण दिले जाते; परंतु बधिर मन झालेल्या समाजातील अन्य मुलांनाही त्याच शिक्षणाची गरज आहे.''






समाजातील तरलता लुप्त होतेय

गिरीश प्रभुणे यांचे मत; पुलोत्सवात स्नेहालय संस्थेला कृतज्ञता पुरस्कार 

म. टा. प्रतिनिधी पुणे 

' मूकबधिर, अपंग मुलांना तपशिलात जाऊन शिकवावे लागते, त्याप्रमाणे समाजातील विचारांमध्ये बधिरता आलेल्यांनाही शिकविण्याची गरज आहे. एकूणच समाजातील तरलता लुप्त होत आहे,' असे मत 'पारधी'कार गिरीश प्रभुणे यांनी शनिवारी व्यक्त केले. 

आशय सांस्कृतिक व परांजपे स्कीम्सच्या वतीने आयोजित नवव्या 'पुलोत्सव तरुणाई'मध्ये अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेस कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी संस्थेच्या वतीने गिरीश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणेरी पगडी, २५ हजार रुपये, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यावेळी प्रभुणे बोलत होते. व्यासपीठावर 'आशय'चे सतीश जकातदार, वीरेंद चित्राव उपस्थित होते. यावेळी स्नेहालय संस्थेच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. 

' मूकबधिर, अपंग मुलांना तपशिलात जाऊन शिकविले जाते, तसेच 'एचआयव्ही'ग्रस्त मुलांनादेखील शिकविण्याची गरज आहे. मात्र समाजाच्या मानसिकतेत विकृतता आली आहे. त्यामुळे विचारांमध्ये बधिरता आलेल्यांना बारकाईने शिकविण्याची आवश्यकता वाटते. हजारो मुलांच्या शाळेत दीडशे 'एचआयव्ही'ग्रस्त मुलांना बाजूला काढले जाते. मात्र त्यांच्या शाळेत बाधित मुलांना सामावून घेता येत नाही. ही मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत समाजाला गिरीश कुलकणीर् यांच्यासारख्या कार्यर्कत्यांची नितांत गरज आहे,' असे गौरवोद्गार गिरीश प्रभुणे यांनी काढले. 'एचआयव्ही' आजाराचा विळखा वाढताना त्या पेशंट्सला सेवा देण्यासाठी कार्यर्कत्यांची संख्या कमी पडते, डॉक्टर्स मिळत नाहीत अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

' 
एचआयव्ही बाधितांसाठी काम करताना कुटुंबीयांसह समाजाच्या विचित्र नजरांना सामोरे जावे लागते. त्यांचा दृष्टिकोन बदलतो. त्यावेळी अशा कामांत क्षणाक्षणाला पराभव होतो. या कामांतून बाहेर पडावे असे वाटते. पण पुलोत्सवासारख्या कार्यक्रमांतून मिळणाऱ्या पुरस्कारांमुळे प्रेरणा मिळते,' असेही प्रभुणे म्हणाले. 

No comments:

Post a Comment