Saturday, 10 December 2011

देहविक्रय करणा-या महिलेचे भूदान



पुणे 

देहविक्रय करणाऱ्या एका महिलेची त्या चक्रव्युहातून सुटका होते..., नगर जिल्ह्यातील 'स्नेहालय' संस्थेत तिला केवळ आसरा मिळत नाही, तर पोटापाण्यासाठी मदतही मिळते..., संस्थेचे ऋण फेडण्यासाठी हीच महिला तिची पुण्यातील जागा संस्थेच्या नावावर करते... 
maharshatra times 11/12/2011, Pune Mata
... शहरात काम करण्यासाठी जागा शोधणाऱ्या 'स्नेहालय' संस्थेला यामुळे हक्काचे छप्पर मिळाले असून, ही सत्यकथा पुढील वषीर् संस्थेच्या 'बालभवन'च्या उद्घाटनाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. आबेदा बेगम शेख या महिलेने कात्रज भागातील संतोषनगर परिसरातील जागा संस्थेला दिली असून, सध्या येथे बांधकाम सुरू आहे. एप्रिलपर्यंत 'स्नेहालय'चे पुण्यातील काम या जागेतूनच सुरू होईल, असा विश्वास संस्थेचे मानद संचालक गिरीश कुलकणीर् यांनी 'मटा'कडे व्यक्त केला. 

नगर जिल्ह्यातील वेश्यांच्या मुलांसाठी काम करण्याचा ध्यास घेऊन कुलकणीर् आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी 'स्नेहालय'ची स्थापना केली. संस्थेचा पसारा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढला. संस्थेच्या पुण्यातील विस्ताराविषयी माहिती देताना कुलकणीर् म्हणाले, 'नगरहून पुण्यात स्थायिक झालेल्या आणि संस्थेचे काम करणाऱ्यांनी येथेही काम करण्यास वाव असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच, पुण्याहून काउन्सेलिंग किंवा इतर सेवेसाठी नगरला येणे प्रत्येकाला शक्य नसल्यानेच गेल्या काही दिवसांपासून आम्ही जागेच्या शोधात होतो. मोठ्या शहरांत जागा मिळवण्यासाठी बरेच कष्ट पडतात. मात्र, संस्थेने केलेल्या मदतीच्या ऋणातून उतराई होत आबेदाने ही जागा आम्हांला दिली.' 

या जागेवर 'बालभवन' सुरू करण्याचा उद्देश असून, झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, अभ्यासासाठी मार्गदर्शन, आरोग्य आणि महिलांसाठी बचतगट अशा स्वरूपाचे कार्य सुरू करण्यात येणार आहे. 'स्नेहालय'वर प्रेम करणाऱ्या पुण्यातील बऱ्याच नागरिकांना केवळ देणगी किंवा आर्थिक मदतीपुरते थांबायचे नाही, तर स्वत:हून काम करण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

काही वर्षांपूवीर्पर्यंत पुण्यातच देहविक्रय करणाऱ्या आबेदा यांना 'स्नेहालय'चा आधार मिळाला. संस्थेच्या सहकार्याने त्यांचे लग्नही झाले अन् त्या नगरमध्येच स्थायिक झाल्या. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले असले, तरी सध्या भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळत आबेदा मुलाला शिकवत आहेत. 

No comments:

Post a Comment