Friday, 30 December 2011
Saturday, 24 December 2011
Monday, 19 December 2011
Pune Award
Sakal 19/12/2011
उपेक्षेचे बळी ठरलेल्यांच्या मागे उभे राहणाऱ्यांची गरज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 19, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: girish kulkarni, pune
पुणे - समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचे हजारो हात पुढे येतात; परंतु याच उपेक्षेचे बळी ठरलेल्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पायांचीही गरज असते, असे मत नगर येथील "स्नेहालय'चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
"आशय सांस्कृतिक आणि परांजपे स्किम्स्' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "पुलोत्सव तरुणाई'त "स्नेहालय'चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांना समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते "पुलोत्सव कृतज्ञता सन्माना'ने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गिरीश कुलकर्णी बोलत होते. व्यासपीठावर "पुलोत्सवा'चे सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारामुळे वेदनांनी भरलेल्या समाजासाठी केलेल्या कामाला समाजमान्यता मिळाल्याची भावना गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ""समाजाची संवेदना हरवत आहे. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली नसल्याची पांढरपेशा वर्गाची भावना होत आहे. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही. त्यासाठी मदतीच्या हातासोबतच उपेक्षेमुळे उद्ध्वस्त झालेल्या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समाजाची आज खऱ्याअर्थाने गरज आहे. त्यासाठी तरुणांनी आत्मप्रेरणेने पुढे यावे.'' या वेळी कुलकर्णी यांनी एचआयव्हीग्रस्तांचे "उभे' केलेले जीवन ऐकवून उपस्थितांना अंतर्मुख व्हायला लावले.
समाजाची तरलता हरवत असून, मानसिकता विकृत होत असल्याचे गिरीश प्रभुणे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""केवळ पैशाने समस्या सुटत नाहीत; तर उमेदीच्या काळात समाजाने वेळ देण्याची गरज आहे. मूक-बधिर विद्यार्थ्यांना वेगळ्या शाळेत शिक्षण दिले जाते; परंतु बधिर मन झालेल्या समाजातील अन्य मुलांनाही त्याच शिक्षणाची गरज आहे.''
गिरीश प्रभुणे यांचे मत; पुलोत्सवात स्नेहालय संस्थेला कृतज्ञता पुरस्कार
म. टा. प्रतिनिधी पुणे
' मूकबधिर, अपंग मुलांना तपशिलात जाऊन शिकवावे लागते, त्याप्रमाणे समाजातील विचारांमध्ये बधिरता आलेल्यांनाही शिकविण्याची गरज आहे. एकूणच समाजातील तरलता लुप्त होत आहे,' असे मत 'पारधी'कार गिरीश प्रभुणे यांनी शनिवारी व्यक्त केले.
आशय सांस्कृतिक व परांजपे स्कीम्सच्या वतीने आयोजित नवव्या 'पुलोत्सव तरुणाई'मध्ये अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेस कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी संस्थेच्या वतीने गिरीश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणेरी पगडी, २५ हजार रुपये, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यावेळी प्रभुणे बोलत होते. व्यासपीठावर 'आशय'चे सतीश जकातदार, वीरेंद चित्राव उपस्थित होते. यावेळी स्नेहालय संस्थेच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
' मूकबधिर, अपंग मुलांना तपशिलात जाऊन शिकविले जाते, तसेच 'एचआयव्ही'ग्रस्त मुलांनादेखील शिकविण्याची गरज आहे. मात्र समाजाच्या मानसिकतेत विकृतता आली आहे. त्यामुळे विचारांमध्ये बधिरता आलेल्यांना बारकाईने शिकविण्याची आवश्यकता वाटते. हजारो मुलांच्या शाळेत दीडशे 'एचआयव्ही'ग्रस्त मुलांना बाजूला काढले जाते. मात्र त्यांच्या शाळेत बाधित मुलांना सामावून घेता येत नाही. ही मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत समाजाला गिरीश कुलकणीर् यांच्यासारख्या कार्यर्कत्यांची नितांत गरज आहे,' असे गौरवोद्गार गिरीश प्रभुणे यांनी काढले. 'एचआयव्ही' आजाराचा विळखा वाढताना त्या पेशंट्सला सेवा देण्यासाठी कार्यर्कत्यांची संख्या कमी पडते, डॉक्टर्स मिळत नाहीत अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
' एचआयव्ही बाधितांसाठी काम करताना कुटुंबीयांसह समाजाच्या विचित्र नजरांना सामोरे जावे लागते. त्यांचा दृष्टिकोन बदलतो. त्यावेळी अशा कामांत क्षणाक्षणाला पराभव होतो. या कामांतून बाहेर पडावे असे वाटते. पण पुलोत्सवासारख्या कार्यक्रमांतून मिळणाऱ्या पुरस्कारांमुळे प्रेरणा मिळते,' असेही प्रभुणे म्हणाले.

समाजातील तरलता लुप्त होतेय

पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - आशय सांस्कृतिक आणि परांजपे स्कीम्स् यांच्यातर्फे १६ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार्या पुलोत्सव तरुणाई महोत्सवात अभिनेते नाना पाटेकर यांना पुलोत्सव सन्मानाने गौरविले जाणार आहे.
पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - आशय सांस्कृतिक आणि परांजपे स्कीम्स् यांच्यातर्फे १६ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार्या पुलोत्सव तरुणाई महोत्सवात अभिनेते नाना पाटेकर यांना पुलोत्सव सन्मानाने गौरविले जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, कवी मंगेश पाडगावकर यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, पुलोत्सवासाठी यंदा विनामूल्य प्रवेश असून, त्यासाठीची नोंदणी आणि प्रवेशिका आशय सांस्कृतिक, पाथफाईंडर आणि परांजपे स्कीम्स, प्रभात रस्ता येथे सुरू आहे. पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. पुलोत्सव तरुणाई सन्मान आणि पुलोत्सव कृतज्ञता सन्मानही या वेळी जाहीर करण्यात आले. अभिनय, दिग्दर्शन, सामाजिक भान आणि देशप्रेम असे अष्टपैलूत्व सिद्ध करणार्या नाना पाटेकर यांना पुल आणि सुनीताबाईंचा स्नेहही लाभला होता. अशा अभिनेत्याला यंदाचा पुल स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुलोत्सवाच्या पहिल्या दिवशी १६ डिसेंबरलाच हा पुरस्कार प्रदान सोहळा होईल, असे चित्राव यांनी सांगितले. यंदाच्या पुलोत्सव तरुणाई सन्मानासाठी किराणा घराण्यातील युवा गायक जयतीर्थ मेवुंडी यांची निवड करण्यात आली आहे. नगरमध्ये वेश्याच्या मुलांसाठी मोठे कार्य उभे करणार्या स्नेहालय संस्थेला कृतज्ञता सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये रोख असे आहे. पुलोत्सव सन्मान सोहळा १६ डिसेंबर रोजी, तर जीवनगौरव पुरस्कार वितरण १९ डिसेंबर रोजी होणार आहे.
Snehalaya Award Ceremony
Snehalaya Award Ceremony 2011
Deshdoot. 16/12/2011
Lokamat 16/12/2011
Snehalaya Award Ceremony
नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या | ||||
आमदार देवेंद्र फडणवीस यांचा दावा | ||||
राजू शेख दिवंगत संसदपटू प्रा. मधू दंडवते यांच्या स्मरणार्थ स्नेहालय संस्थेतर्फे दिला जाणारा कर्तव्यशील लोकप्रतिनिधी पुरस्कार आमदार देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करताना प्रकाश आंबेडकर./ इतर छायाचित्रे व वृत्त हॅलो नगर ३वर अहमदनगर। दि. १८ (प्रतिनिधी) राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगली प्रगती केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने अत्यंत अनिर्बंधपणे पैशाचा वापर केल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीला जरी निवडणुकीत यश मिळाले असले तरी भाजपच्या जागा वाढल्या आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या ६७९ जागा होत्या. त्या वाढून आज ८00 पर्यंत झाल्या आहेत. मागील निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेला भाजपा आज तिसर्या क्रमांकावर आला आहे असे ते म्हणाले. येथील स्नेहालय संस्थेचा 'कर्तव्यशील लोकप्रतिनिधी पुरस्कार' आज फडणवीस यांना प्रदान करण्यात आला. या समारंभासाठी आज ते नगरला आले असता त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वरील प्रतिपादन केले. यावेळी सदा देवगांवकर, प्रा. भानुदास बेरड, बाबासाहेब वाकळे, जगन्नाथ निंबाळकर, विनोद बोथरा, श्याम पिंपळे, बाळासाहेब पोटघन, मालनताई ढोणे, सचिन पारखी, शिवाजी लोंढे, दत्ता कावरे, बाळासाहेब गायकवाड, विनोद भिंगारे, आबा गुंड, प्रवीण ढोणे, डॉ. अमरजा रेखी, सुप्रिया जानवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार फडणवीस म्हणाले, कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळेच भाजपाचे काम वाढत आहे. दोन्ही काँग्रेस पैसे वाटून करीत असलेल्या निवडणुका या लोकशाहीस घातक आहेत. पण पैसा हा सर्वस्व नाही. हे खडकवासला निवडणुकीतील निकालाने दाखवून दिले आहे. आता येणार्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन त्यांची कामे करावीत. केवळ प्लेक्स बोर्डवरचे कार्यकर्तेन होता खर्या अर्थाने तळमळीने पक्षाचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. स्नेहालय संस्थेच्यावतीने मिळालेले वार्षिक पुरस्कार प्रकाशआंबेडकर यांच्या हस्ते स्वीकारताना डावीकडून अँड. शाम असावा, जयप्रकाश दशपुत्रे, शाम पिंपळखरे, आमदार देवेद्र फडणवीस, संतोषगर्जे, जयताई जोगदंड, जयश्री शिंदे, लता जोशी, शुभा बेंन्नोरवार, राजू शेख |
Sunday, 11 December 2011
कासव जत्रा.! वायंगणीकिनारी
सध्या सर्वत्र जत्रोत्सव सुरू आहेत. या जत्रोत्सवांना कोकणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा असेल, तर या जत्रोत्सवाबरोबरच अनेक प्रकारच्या जत्रा भरवल्या गेल्या पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून वायंगणीच्या (ता. वेंगुर्ले) समुद्रकिनार्यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने किरात ट्रस्टने २७ ते २९ डिसेंबरदरम्यान ही यात्रा भरविली आहे. - सुहास तोरसकर, प्राणिमित्र विनायक वारंग। दि. १0 (वेंगुर्ले) कासव जत्रा..? हो! कासव जत्राच.. पण येथे कासव विकायला येणार नाहीत, तर ही आहे पर्यावरण रक्षणात हातभार लावणारी जत्रा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणीच्या समुद्रकिनारी ती २७ ते २९ डिसेंबरदरम्यान भरणारआहे. काय आहे ही कासव जत्रा? ऑलिव्ह रिडले, हॉर्सबिल, ग्रीन कासव, लेदर बँक या काही प्रमुख कासव जातींपैकी ऑलिव्ह रिडले जातीची दुर्मीळ कासवे गेल्या काही वर्षांत दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत अंडी घालण्यासाठी वायंगणी - वेंगुर्ले, तांबळडेग - देवगड या किनार्यांवर येत आहेत. येथे ग्रीन कासव आणि हॉर्सबिलने केवळ एक-दोनदाच दर्शन दिले आहे. कासवांची ही अंडी संरक्षित करण्याचे कार्य वायंगणी येथील प्राणिमित्र सुहास तोरसकर करीत आहेत. यासाठी त्यांना वनविभागाचे सहकार्य लाभले आहे. वायंगणी किनारा आणि तेथील कासवांची अंडी द्यावयाचा हंगाम हे जागतिक पर्यावरणस्नेही व निसर्गप्रेमींसाठी उत्कृष्ट पर्यटनस्थळ होऊ शकेल. हा विषय आणि जागेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीच ही कासव जत्रा भरणार आहे. या उपक्रमात स्थानिक तरुणांना सामील करून घेण्यात यश आले आहे. आता स्थानिक माणसे कासवांच्या अंड्यांचे त्यांचे संर्वधन करून निसर्गरक्षणात खारीचा वाटा उचलणार आहेत. मानवी हाव जीवघेणी... माणसाची वाढलेली हाव, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी, जगभरात कासवांचे मांस आणि अंड्यांना असलेली मागणी यामुळे वाळूतील ही अंडी पळविण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. मांसाशिवाय कवचासाठी सुद्धा कासवांची शिकार केली जाते. सध्या कासवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. ही यात्रा कासवांच्या रक्षणासाठी जनतेत जागृती निर्माणकरेल. दीर्घायुषी कासव... कासवाची पाठ जेवढी कठीण असते तितकेच ते दीर्घायुषी असते. कासव शंभर वर्षांपर्यंत जगू शकते. बमादी कासव समुद्रकिनारी एकांतात वाळूमध्ये खड्डा खोदून अंडी घालते. एका वेळी कमीत कमी ४0 ते जास्तीत जास्त १00 अंडी घालते व त्यानंतर तो खड्डा वाळूने भरते. अंड्यांना उष्णता मिळण्यासाठी अंडी घातल्यानंतर मादी कासव पुन्हा समुद्रात जाते. आपली अंडी आणि त्यांतून बाहेर पडणारी पिल्ले यांना ही मादी पुन्हा कधीच पाहात नाही. नैसर्गिकपणेच या कासवांच्या जगण्याचा दर ५0 टक्केच असतो. सुरक्षित किनारा... भारतात ओरिसाच्या समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात. फार मोठय़ा प्रमाणावर येणार्या कासवांच्या संख्येने या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. हा किनारा कासवांसाठी सुरक्षित झाला आहे. अशीच दुसरी जागा म्हणून वायंगणीचा किनारा पुढे आला आहे. सध्या सर्वत्र जत्रोत्सव सुरू आहेत. या जत्रोत्सवांना कोकणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा असेल, तर या जत्रोत्सवाबरोबरच अनेक प्रकारच्या जत्रा भरवल्या गेल्या पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून वायंगणीच्या (ता. वेंगुर्ले) समुद्रकिनार्यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने किरात ट्रस्टने २७ ते २९ डिसेंबरदरम्यान ही यात्रा भरविली आहे. - सुहास तोरसकर, प्राणिमित्र |
Saturday, 10 December 2011
देहविक्रय करणा-या महिलेचे भूदान
पुणे
देहविक्रय करणाऱ्या एका महिलेची त्या चक्रव्युहातून सुटका होते..., नगर जिल्ह्यातील 'स्नेहालय' संस्थेत तिला केवळ आसरा मिळत नाही, तर पोटापाण्यासाठी मदतही मिळते..., संस्थेचे ऋण फेडण्यासाठी हीच महिला तिची पुण्यातील जागा संस्थेच्या नावावर करते...
maharshatra times 11/12/2011, Pune Mata
... शहरात काम करण्यासाठी जागा शोधणाऱ्या 'स्नेहालय' संस्थेला यामुळे हक्काचे छप्पर मिळाले असून, ही सत्यकथा पुढील वषीर् संस्थेच्या 'बालभवन'च्या उद्घाटनाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. आबेदा बेगम शेख या महिलेने कात्रज भागातील संतोषनगर परिसरातील जागा संस्थेला दिली असून, सध्या येथे बांधकाम सुरू आहे. एप्रिलपर्यंत 'स्नेहालय'चे पुण्यातील काम या जागेतूनच सुरू होईल, असा विश्वास संस्थेचे मानद संचालक गिरीश कुलकणीर् यांनी 'मटा'कडे व्यक्त केला.
नगर जिल्ह्यातील वेश्यांच्या मुलांसाठी काम करण्याचा ध्यास घेऊन कुलकणीर् आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी 'स्नेहालय'ची स्थापना केली. संस्थेचा पसारा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढला. संस्थेच्या पुण्यातील विस्ताराविषयी माहिती देताना कुलकणीर् म्हणाले, 'नगरहून पुण्यात स्थायिक झालेल्या आणि संस्थेचे काम करणाऱ्यांनी येथेही काम करण्यास वाव असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच, पुण्याहून काउन्सेलिंग किंवा इतर सेवेसाठी नगरला येणे प्रत्येकाला शक्य नसल्यानेच गेल्या काही दिवसांपासून आम्ही जागेच्या शोधात होतो. मोठ्या शहरांत जागा मिळवण्यासाठी बरेच कष्ट पडतात. मात्र, संस्थेने केलेल्या मदतीच्या ऋणातून उतराई होत आबेदाने ही जागा आम्हांला दिली.'
या जागेवर 'बालभवन' सुरू करण्याचा उद्देश असून, झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, अभ्यासासाठी मार्गदर्शन, आरोग्य आणि महिलांसाठी बचतगट अशा स्वरूपाचे कार्य सुरू करण्यात येणार आहे. 'स्नेहालय'वर प्रेम करणाऱ्या पुण्यातील बऱ्याच नागरिकांना केवळ देणगी किंवा आर्थिक मदतीपुरते थांबायचे नाही, तर स्वत:हून काम करण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही वर्षांपूवीर्पर्यंत पुण्यातच देहविक्रय करणाऱ्या आबेदा यांना 'स्नेहालय'चा आधार मिळाला. संस्थेच्या सहकार्याने त्यांचे लग्नही झाले अन् त्या नगरमध्येच स्थायिक झाल्या. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले असले, तरी सध्या भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळत आबेदा मुलाला शिकवत आहेत.
Thursday, 8 December 2011
Wednesday, 7 December 2011
‘हिम्मतग्राम’ देईल एड्सग्रस्तांना सन्मानाचे जगणे...
दैनिक दिव्य मराठी :- दिनांक ८ डिसेंबर
नगर - ‘स्नेहालय’ने आजवर केलेल्या कामाची पावती म्हणजे ‘पुलोत्सव कृतज्ञता सन्मान’ आहे. या पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला असून ‘हिम्मतग्राम’च्या उभारणीसाठी नवे बळ मिळाले आहे, असे स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना बुधवारी सांगितले.
स्नेहालयच्या कामाला सन 1989 मध्ये सुरुवात झाली. छोट्या प्रकल्पापासून सुरू झालेले हे काम आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. पुलोत्सव पुरस्काराच्या रूपाने या कामाचा गौरव झाला आहे. त्याचे श्रेय सर्व कार्यकर्त्यांना आहे, असे ते म्हणाले.
स्नेहालयने आता हिम्मतग्रामची उभारणी सुरू केली आहे. निंबळक-इसळक परिसरातील 35 एकर जागेत हा प्रकल्प उभा राहत असून तेथे 100 एड्सबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असेल, असे त्यांनी सांगितले.
हिम्मतग्रामविषयी अधिक माहिती देताना शिंगवी म्हणाले, एड्सग्रस्तांना केवळ औषधोपचारांची गरज नसते. त्यांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. त्यासाठी सन्मानाची वागणूक मिळायला हवी. हिम्मतग्राममध्ये राहणारे स्वत:च्या पायावर उभे असतील. त्यांच्यासाठी योग्य काम उपलब्ध केले जाईल. कोणाला शेतीची आवड असेल तर ते तेथे नैसर्गिक शेती करतील, कोणाला सुतारकाम येत असेल तर त्यांना ती साधने उपलब्ध करून दिली जातील. या मंडळींसाठी राहण्या, जेवणाबरोबर सुसज्ज हॉस्पिटलची सुविधा तेथे असेल. सुमारे 200 कोटींचा हा प्रकल्प असून टप्प्याटप्प्याने येत्या 10 वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम पूर्ण झाले असून या कामावर देखरेख ठेवण्याचे काम एड्सबाधित मंडळीच करीत आहेत. त्यांनी तेथे फळबागही तयार केली आहे. हिम्मतग्रामच्या उभारणीत सगळ्यांचा सहयोग हवा आहे, असे सांगून शिंगवी म्हणाले, या प्रकल्पासाठी पाण्याची गरज होती. सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून पाणी आणण्याकरिता मुंबई येथील अरुण सेठ यांनी आर्थिक सहकार्य केले. बांधकाम साहित्याबरोबर शेतीची अवजारे, ट्रॅक्टर यासाठी इतरांकडून मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. स्नेहालयचा मी अध्यक्ष असलो, तरी हे टीमवर्क आहे. प्रत्येकाच्या कौशल्याचा संस्थेसाठी कसा उपयोग होईल हे पाहून त्यांना कामाचे स्वातंत्र्य दिले आहे. डॉ. गिरीश कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, अंबादास चव्हाण यांच्यासह सर्व टीम 24 तास झटत असल्यानेच संस्थेची क्षितिजे विस्तारत आहेत, पंखांना नवे बळ प्राप्त होत आहे, असे शिंगवी यांनी सांगितले.
गरज आहे हातांची...
परिवर्तनाच्या कामाला पैशांपेक्षा खरी गरज असते हातांची, लोकसहभागाची. लोकांनी स्नेहालयला भेट देऊन तेथील काम पाहावे, अनुभूती घ्यावी आणि या कामात आपल्याला कसे सहभागी होता येईल हे ठरवावे.
डॉ. गिरीश कुलकर्णी, संस्थापक, स्नेहालय.
Tuesday, 6 December 2011
Snehalaya Madhye Vastalya & Matrutvachi Anubhuti
Daily Lokamat -6/11/2011
'स्नेहालया'मध्ये वात्सल्य आणि मातृत्वाची अनुभूती |
अहमदनगर। दि. ६ ( प्रतिनिधी) लालबत्ती भागातील बालके, एच.आय.व्ही. बाधित तसेच हक्क वंचित बालकांना स्नेहालय संस्थेच्या सर्वप्रकल्पात वात्सल्य आणि मातृत्वाची अनुभूती मिळतेअसे प्रतिपादन अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले. सिंधुताई तसेच त्यांचे मानसपुत्र विनय यांनी स्नेहालयाच्या विविध प्रकल्पांना तसेच अनाम प्रेमच्या अंध मुलांच्या पुनवर्सन प्रकल्पास नुकतीच भेट दिली. प्रकल्पातील बालकांशी आणि काळजीवाहकांशी माईंनी संवाद केला. यावेळी श्रीमती सपक ाळ यांचा स्नेहालय परिवाराने मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब दुशिंग यांच्या हस्ते गौरव केला. श्रीमती सपकाळम्हणाल्या, बदलत्या परिस्थितीत हक्क वंचित आणिअनाथ मुलांसाठी अनेक माइर्ंची गरज पडणार आहे. स्नेहालय संस्थेत कोणीही बालकांसाठी काम करू शकतो. स्नेहालयाचा हा खुलेपणा आणिपारदर्शकता बालसेवी संस्थांसाठी अनुकरणीय असल्याचे त्या म्हणाल्या. हनिफ शेख यांनी प्रास्ताविक केले तर प्रवीण मुत्याल यांनी आभार मानले. सर्वश्री अजय वाबळे, अजित माने, अशोक मुळे, अनंत कुलकर्णी, अनुपमा भापकर, मंगेश जोंधळे, डॉ. स्मिता खोजे, रूपाली देशमुख यांनी सपकाळयांच्या भेटीचे नियोजन केले. |
Saturday, 3 December 2011
Friday, 2 December 2011
बेनझीरच्या पालकांना आवाहन
अहमदनगर-शिर्डी येथील साईबाबा मंदिर परीसरात नगर-मनमाड रोडलगत गेट नंबर ४ जवळ आकाशी रंगाच्या साडीमध्ये गुंडाळलेले स्त्री जातीचे एक ते दीड महिन्याची बालिका सापडली आहे. पोलिसांनी तिला काळजी व संरक्षणासाठी नगरच्या स्नेहाकुंर प्रकल्पात ठेवले आहे. तिचे नामाकरण बेनझीर असे ठेवण्यात आले असून संबंधीत पालकांनी संस्थेशी संपर्क साधावा. एक महिन्याच्या आत संपर्क न केल्यास कायद्यानुसार या बालिकेच्या पुर्नवसनासाठी कार्यवाही केली जाईल.
Subscribe to:
Posts (Atom)