लाल बत्ती भागातील महिला व मुले यांच्या सामजिक उथ्यानासाठी गेली २१ वर्ष काम करणाऱ्या अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचा बालभवन प्रकल्प कात्रज, पुणे येथे सुरु होत आहे. या घटनेचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या संघर्षमय वाटचाली विषयी अनुभव कथन संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी करणार आहेत. सिद्धहस्त लेखक श्री. अनिल अवचट या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दि. ३० जून रोजी सायं. ५.३० वा. हा कार्यक्रम "निवारा वृद्धाश्रम" सिहगड रोड येथे संपन्न होईल.
Snehalaya Rehab Center |
![]() |
Rehab Center Students |
![]() |
Slum Area Boy and Girl |
![]() |
Bhalbhan Students |
स्नेहालय : शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी चाललेली अखंड धडपड.
'स्नेहालय' - अहमदनगर शहरातील एक संस्था - डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी लाल बत्ती भागात, देहव्यापारात अडकलेल्या महिला आणि बालकांच्या प्रत्यक्ष पुनर्वसनासाठी स्नेहालय संस्थेची
स्थापना १९८९ साली स्थापना केली. सुरुवातीला लाल बत्ती
भागातील बालकांसाठी स्नेहालयाचे 'रात्रघर' नगर शहरातील गांधी मैदानात चालायचे. लाल बात्ती भागात मुला मुलींना गाणी,गोष्टींसोबतच संस्कार मुल्ये दिली जायची. त्यांची रुजवणूक व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबविले जायचे, परंतु ठराविक वेळानंतर मुले मुली या वर्गातून परत आपल्या गल्लीत परतायची. ह्या वर्गाचा संस्कार त्यांच्या मनात फार काळ टिकायचा नाही. गल्लीचा प्रभाव इतका असायचा कि त्यांची पावले परत परत तिथे वळायची. या सर्व परिस्थितीत स्थायी बदल
घडवून आणण्यासाठी अखंड सेवा भाव जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनेच एखादा स्थायी स्वरूपी प्रकल्प असणे फार गरजेचे होते. त्या शिवाय या मुला मुलींच्या शिक्षणाचे आणि पुनर्वसनाचे कार्य कसे होणार होते? या अविरत धडपडीतून आणि चिंतनातूनच स्नेहालयाचे कार्य पुढे जात राहिले आणि आज त्याचा एक मोठा वटवृक्ष होवू पहात आहे. आज स्नेहालय संस्था हि १८ प्रकल्पांची स्वयंस्फुर्तीने अविरत चालणारी स्वयंसेवी संस्था झाली आहे.
![]() |
Child Line 24 Hours Help line |
![]() |
Snehankur Adoption Center |
Yuva Prerana Shibir (Youth Project) |
Sneha Asha Project (HIV Positive Child) |
![]() |
Dom |
I.T. Center |
Himmatgram |
स्नेहालय तर्फे नगर जिल्ह्यातील प्रत्येक लाल बत्ती भागात परिवर्तन संकुल चालवले जाते. हि परिवर्तन संकुले नगर, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, श्रीगोंदा येथे आहेत. या परिवर्तन संकुलातून देह विक्री करणाऱ्या भगिनींची काळजी घेतली जाते. त्यांच्यातील गुप्तरोगा संबंधी वेळीच काळजी घेतल्याने नगर जिल्ह्यातील देहविक्री करण्यार्य महिलांच्यातील गुप्तरोगाचे प्रमाण शून्य झाले आहे हेच स्नेहालायाचे यश म्हणता येईल.
स्नेहालयाने नव्या नव्या प्रकल्पातून शोषित -वंचित समाज समूहाच्या परिवर्तनाचा ध्यासच घेतला आहे. स्नेहालयाने दोन वर्ष पूर्वी कम्युनिटी रेडीओ ची स्थापना केली आहे. या रेडीओ वाहिनीने अल्पावधीतच गरजू आणि हक्क वंचित बांधवांचा आवाज बनली आहे.
स्नेहालय हिम्मात्ग्राम प्रकल्पातून आता एच आई व्ही एड्स बाधित कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. हिम्मत ग्राम प्रकल्प ४० एकर परिसरात बहरत आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, व्यावसायिक प्रशिक्षण यातून या बांधवांचे भगिनींचे आयुष्य फुलणार आहे.
नव नवीन समाज प्रकल्पाद्वारे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मुलभूत जीवनमानाचा स्तर घेऊन जाणे हेच स्नेहालायचे एकमेव ध्येय आहे. या सेवा कार्याची पूर्ती स्नेहालयकडून होत आहे.
गरज सक्रीय पाठबळाची
Jay Hind ! (15 August - independence day) |
स्नेहालय च्या प्रकल्पांना कार्यकर्त्यांना भेटल्यावर आपल्यातील सेवाभाव जागा होतो. बोथट जाणीवा अंकुरतात आणि जगण्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहू लागतो. स्नेहालय हि एक शोषणमुक्त सामाजनिर्मितीची चळवळ आहे. प्रत्येक उंबऱ्याला तिचा स्पर्श झाल्यावाचून त्या चळवळीच्या उद्दिष्टांची पूर्तता अशक्य आहे. स्नेहालयाच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन आपण जिथे राहता त्या परिसरातील बांधवांना आपल्यातील सहयोगाचा हात देणे गरजेचे आहे. परिवर्तन हे काही केवळ वैचारिक मंथनातून शक्य नाही. प्रत्येक वैचारिकतेला कृतीची जोड असल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. स्नेहालयची हीच कृतिशीलता उद्याच्या नव भारत निर्माणासाठी महत्वपूर्ण बनेल अशी खात्री वाटते.
No comments:
Post a Comment