 |
 |
प्रारंभी टेलीफिल्मव्दारे युवतींनी या संघटनेशी का जोडले जावे? याची माहिती दाखविण्यात आली. त्यानंतर सुळे यांचे व्यासपीठावर आगमन होताच अनेक गुलाबी फेटे परिधान केलेल्या युवतींनी व्यासपीठावर 'नवी दिशा नवी उभारी राष्ट्रवादी लई भारी' या गीतावर ठेका धरला. त्यावेळी सुप्रियाताईंनाही या युवतींबरोबर ताल धरण्याचा मोह आवरला नाही. यावेळी श्रध्दा धूत,श्रेया भालेराव, माधुरी लोंढे, प्रियंका जगताप, किरण म्हस्के, सुषमा चव्हाण, तृप्ती मगर या युवतींनी मनोगत व्यक्त केले. आयमन इनामदार या चिमुरडीने स्त्रीभ्रूणहत्येवर सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाने सार्यांनाच हेलावून टाकले. अहमदनगर। दि. १४(प्रतिनिधी) पक्ष म्हणजे राजकारण व राजकारण म्हणजे तिकीट हा समज चुकीचा आहे. समाजप्रबोधन व परिवर्तनाची ताकद ही सत्तेपेक्षा अधिक असते यावर आमचा विश्वास आहे. पुढार्यांच्या पोरींना नव्हे तर सर्वसामान्य घरातून आलेल्या व राजकीय पाठबळ नसलेल्या मुलींना संघटनेच्या माध्यमातून पाठबळ दिले जाईल असा विश्वास राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रमुख संघटक खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा युवती मेळावा आज दुपारी सहकार सभागृहात झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. मेधा कांबळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे, सदस्या प्रतिभाताई पाचपुते, अँड. शारदा लगड, निर्मला मालपाणी, डॉ. क्रांतीकला अनभुले, गुलनाझ इनामदार, भगिरथी शिंदे आदी उपस्थित होत्या. सुळे म्हणाल्या, कुणाच्याही घरात कौटुंबिक हिंसाचारातून महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी प्रथम राष्ट्रवादी युवती संघटना पुढे राहिल. मुलींची छेडछाड विरोधी हेल्पलाईन जी मुंबईत सुरू झाली आहे ती संपूर्ण राज्यभर सुरू करण्यात येणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणायचा आहे. आगामी काळातला महाराष्ट्र घडवायचा आहे. या युवतीतूनच उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व तयार होणार आहे. पिचड म्हणाले, ही संघटना स्थापनेचा हेतू राजकीय नाही तर सामाजिक आहे. या व्यासपीठावरुन महिला सबलीकरणाची चळवळ उभी राहिल. महिलांच्या अन्यायाच्या विरोधात ही संघटना उभी राहिली. आदिवासी समाजात महिलांना मानाचे स्थान आहे पण ते सुशिक्षित समाजाला कळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेलार यांचेही यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक डॉ. मेघा कांबळे यांनी तर स्वागत शहराध्यक्ष राजश्री मांढरे यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले. राजू शेख
|
No comments:
Post a Comment