Saturday, 16 June 2012

ब्रिटिश संसदेत अण्णांचा सन्मान...स्नेहालय'चा विस्तार सर्वत्र व्हावा


Published on 16 Jun-2012
ब्रिटिश संसदेत अण्णांचा सन्मान
ब्रिटिश संसदेत अण्णांचा सन्मान 
अण्णा हजारे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नगर येथील स्नेहालय संस्थेत त्यांची ग्रंथतुला करण्यात आली छाया : कल्पक हतवळणे 
राष्ट्रपतिपदाचा उमेदवार चारित्र्यसंपन्न असावा
4 राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च् व पवित्र पद आहे. राष्ट्रपती निवडीचा अधिकार संसदेला असला तरी या पदाचे सर्वांनीच पावित्र्य जपले पाहिजे. त्याच्या निवडीसाठी राजकारण टाळायला हवे. राष्ट्रपतिपदासाठीचा उमेदवार राजकीय पार्श्वभूमी नसलेला, चारित्र्यसंपन्न, लोकतंत्राची माहिती असणारा व समाजाशी नाळ जोडलेला असणे गरजेचे आहे.' अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>कर्तृत्वाची दखल, सदस्य बॅरी गार्डिनर यांचे अण्णांना पत्र 
प्रतिनिधी । नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कर्तृत्वाची ब्रिटिश संसदेने दखल घेतली आहे. 17 जुलै रोजी त्यांचा 'फेन्नर ब्रॉकवे'मेडल देऊन ब्रिटिश संसदेत सन्मान करण्यात येणार आहे. त्या वेळी अण्णा जनलोकपालसाठी सुरू असलेल्या लढय़ाची माहिती देणार आहेत.

अण्णांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मजूर पक्षाच्या लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे ब्रिटिश संसद सदस्य बॅरी गार्डिनर यांनी तसे अधिकृत निमंत्रण 16 मे रोजीच पाठवले आहे. त्याचा स्वीकारही अण्णांनी केला.

असे आहे ब्रिटिश संसद सदस्याचे पत्र

लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया ही मजूर पक्षाची संस्था भारतीय व ब्रिटिश संसद सदस्यांतील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी काम करते. भारत हा उगवती महासत्ता आहे, हे ओळखून असलेल्या मजूर पक्षाच्या धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. परस्पर राजकीय संबंध अधिक चांगले व्हावेत, यासाठी आम्ही मजूर पक्षाच्या खासदारांना तुम्ही चालवलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची माहिती दिली आहे. आपणास ज्यांच्या नावे मेडल देणार आहोत, ते फेन्नर ब्रॉकवे यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश संसदेत जोरदार आवाज उठवला होता. भारत व ब्रिटन यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी व नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी काम करणार्‍यांना हे मेडल दिले जाते.

ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर व माजी परराष्ट्र मंत्री ज्ॉक स्ट्रॉ हे या पदकाचे आधीचे मानकरी आहेत. आपल्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी येथील संसद सदस्य संवाद साधण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे कार्यक्रमासाठी संसदेत 17 जुलै रोजी दुपारी ब्रिटिश संसदेत सर्वपक्षीय सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही बॅरी गार्डिनर यांनी दिली आहे. 


 
Published on 16 Jun-2012
Share
loading...
 

No comments:

Post a Comment