राष्ट्रपती संसद
ठरवेल, मी नव्हे! | ||
सुरेश मैड अहमदनगर। दि. १५ (प्रतिनिधी)
देशाचा भावी राष्ट्रपती कोण असावा हे संसद ठरवेल. मी ठरवणारा कोण? पण हे देशाचे सर्वोच्च पद आहे त्यामुळे या पदावर चारित्र्यवान, हुशार व सुशील नागरिक असावा अशी माझी भूमिका आहे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. तसेच जनलोकपालच्या लढय़ासाठी राज्यानंतर आता देशाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. अण्णांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आज(दि.१५) सकाळी स्नेहालय येथे उपेक्षित वंचित मुलांबरोबर साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अण्णा बोलत होते. ते म्हणाले, महापुरुषांनी जे बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. ते अधुरेच आहे. ते काहीसे करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. आज विषमतेची दरी प्रचंड वाढत आहे. गरीब-श्रीमंत हा भेद कमी व्हायला हवा. निसर्ग व मानव दोघांचेही शोषण सुरूच आहे. ते थांबले पाहिजे. जनलोकपाल चळवळीबाबत बोलताना अण्णा म्हणाले, शासन हे विधेयक आणण्याची टाळाटाळ करीत आहे ते चूक असून आता मी जनजागृतीसाठी देशाचा दौरा करणार आहे व त्यानंतर याबाबत दिशा ठरविली जाईल, असे अण्णा हजारे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्नेहालय संस्थेने त्यांचा मानपत्र देऊन आज गौरव केला. यावेळी शिक्षणतज्ज्ञ मामा कौंडिण्य, आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार आदी उपस्थित होते. |
Saturday, 16 June 2012
राष्ट्रपती संसद ठरवेल, मी नव्हे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment