Tuesday, 26 June 2012

स्नेहालय : शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी चाललेली अखंड धडपड.


लाल बत्ती भागातील महिला व मुले यांच्या सामजिक उथ्यानासाठी गेली २१ वर्ष काम करणाऱ्या अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचा बालभवन प्रकल्प कात्रज, पुणे येथे सुरु होत आहे. या घटनेचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या संघर्षमय वाटचाली विषयी अनुभव कथन संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी करणार आहेत. सिद्धहस्त लेखक श्री. अनिल अवचट या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दि. ३० जून रोजी सायं. ५.३० वा. हा कार्यक्रम "निवारा वृद्धाश्रम"  सिहगड रोड येथे संपन्न होईल. 
Snehalaya Rehab Center 

Rehab Center Students 
Slum Area Boy and Girl 


Bhalbhan Students 

स्नेहालय : शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी चाललेली अखंड धडपड. 

'स्नेहालय' - अहमदनगर शहरातील एक संस्था - डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी लाल बत्ती भागात, देहव्यापारात अडकलेल्या महिला आणि बालकांच्या प्रत्यक्ष पुनर्वसनासाठी स्नेहालय संस्थेची 

स्थापना १९८९ साली स्थापना केली. सुरुवातीला लाल बत्ती 
भागातील बालकांसाठी स्नेहालयाचे 'रात्रघर' नगर शहरातील गांधी मैदानात चालायचे. लाल बात्ती भागात मुला मुलींना गाणी,गोष्टींसोबतच संस्कार मुल्ये दिली जायची. त्यांची रुजवणूक व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबविले जायचे, परंतु ठराविक वेळानंतर मुले मुली या वर्गातून परत आपल्या गल्लीत परतायची. ह्या वर्गाचा संस्कार त्यांच्या मनात फार काळ टिकायचा नाही. गल्लीचा प्रभाव इतका असायचा कि त्यांची पावले परत परत तिथे वळायची. या सर्व परिस्थितीत स्थायी बदल 

घडवून आणण्यासाठी अखंड सेवा भाव जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनेच एखादा स्थायी स्वरूपी प्रकल्प असणे फार गरजेचे होते. त्या शिवाय या मुला मुलींच्या शिक्षणाचे आणि पुनर्वसनाचे कार्य कसे होणार होते? या अविरत धडपडीतून आणि चिंतनातूनच स्नेहालयाचे  कार्य पुढे जात राहिले आणि आज त्याचा एक मोठा वटवृक्ष होवू पहात आहे. आज स्नेहालय संस्था हि १८ प्रकल्पांची स्वयंस्फुर्तीने अविरत चालणारी स्वयंसेवी संस्था झाली आहे. 
Child Line 24 Hours Help line

Snehankur Adoption Center 

Yuva Prerana Shibir (Youth Project)


Sneha Asha Project (HIV Positive Child) 

Dom 



I.T. Center

Himmatgram

C.C.C. (Community Care Center)लाल बत्ती हा भाग सर्वात शोषित समाज घटक आहे. गुंड, पोलीस, लुटारू, पांढरपेशी समाज, धन दांड्ग्यांकडून गल्लीतील बायकांवर अत्याचार केले जायचे. शारीरिक तसेच मानसिक शोषणामुळे आरोग्याच्या समस्या महिलांना भेडसवायच्या   . आजही भारतातील कोणत्याही  लाल बत्ती भागातील महिला व्याधी ग्रस्त आहेत. समाज मान्य सन्मानाचे जीवन जगण्याची संधी समाजाच्या शोषणाचा व अत्याचाराचा भाग बनलेल्या महिला आणि मुलींना कधीच मिळत नाही. अहमदनगर शहरातील चित्रा, भगत, रेणुकानगर आधी लालबत्ती भागातील परिस्थिती दोन दशकांपूर्वी अशीच होती. आज स्नेहालायाच्या कामामुळे नगर जिल्ह्यातील संपूर्ण लालबत्ती मध्ये एकही अल्पवयीन मुलगी शरीर विक्रीच्या धंद्यामध्ये नाही. वेश्येशी मुलगी वेश्या होणे हि अमानुषता पूर्णपणे संपली आहे. स्नेहालय फुलले , भाळी भाग्य उजळले बाल वेश्यांचे भारतातील प्रमाण जागतिकी करणात वाढले आहे. झोपडपट्ट्यातून  बार बाला, बाल वेश्या धंद्यासाठी आणल्या जातात. नागरी करणात मुंबई - पुणे सारख्या शहरात रोज गल्ल्यांमध्ये  नवे चेहरे विकताना दिसतात. स्नेहालयाच्या कार्य पुर्तीतून या जीवघेण्या परिस्थितीत बदल झाला आहे. स्नेहालयाने उभारलेल्या  स्नेह्ज्योत आणि हिम्मत गरम समुदाय काळजी केंद्र यांचे कार्य आज विविध सर्वेक्षणात पथदर्शक ठरले आहेत. 
        स्नेहालायाचा मुख्य प्रकल्प नगरच्या औद्योगिक वसाहतीत आहे. या स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात जवळ जवळ ४०० मुले मुली राहतात. ज्या घरात शिक्षणाची पाटी पेन्सिल कधीही हातात नव्हती, त्या घरातील मुले आज स्नेहाल्य्च्या इंग्लिश माध्यमाच्या  शाळेत इंग्रजीचे धडे गिरवत आहेत. इंग्रजीच्या  राहीम्स मराठी कवितांबरोबर या मुलांच्या तोंडून ऐकताना समाजाच्या विषमतेच्या दऱ्या ओलांडून समान पातळीवर आलेला समाज आपल्याला दिसू लागतो. नागरी करणाच्या रेट्यात झोपडपट्ट्यांचा  विळखा सगळ्या शहरांना पडत आहे. झोपड पट्ट्यानमधून बाल गुन्हेगारी, लैंगिक शोषण, अवैध धंदे आदि चालवले जातात. झोपड पट्ट्या हाच देश विकासातील महत्वाचा घटक बनला आहे. झोपड पट्ट्या विकासातूनच शहराचा विकास शक्य आहे हे वास्तव स्नेहालायाने ओळखले आणि बाल भवन या उपक्रमाची सुरुवात झाली. झोपडपट्टी तेथे बाल भवन या सूत्राला धरून आज स्नेहालय हळू हळू आपले कार्य  ठिक ठिकाणी पसरवत आहे. २००५ साला पासून नगर शहरातील  एकूण ५ झोपडपट्ट्या मधून बालभवन प्रकल्प चालतो. शिक्षण, आरोग्य, व मुल्यसंस्कार या त्रि सूत्रीवर हे कार्य चालते. आज बालभवनच्या माध्यमातून १२०० पेक्षा  अधिक मुलामुलींना शिकण्यास पूरक वातावरण मिळाले आहे. यातूनच स्नेहालयाने आदर्श झोपडपट्ट्याची चळवळ उभारली आहे. ज्या झोपडपट्ट्या मध्ये आरोग्याच्या पुरेशा सोयी सुविधा आहेत, शिक्षणापासून एकही विध्यार्थी दूर नाही, बाल आरोग्याची काळजी घेतली जाते अशी कुटुंबे असावीत म्हणून नगरमधील संजय नगर, बोरकर नगर, लाल टाकी , रामवाडी आदि झोपडपट्टया  मधून स्नेहालय सतत कार्यरत आहे. 
स्नेहालय तर्फे नगर जिल्ह्यातील प्रत्येक लाल बत्ती भागात परिवर्तन संकुल चालवले जाते. हि परिवर्तन संकुले नगर, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, श्रीगोंदा येथे आहेत. या परिवर्तन संकुलातून देह विक्री  करणाऱ्या भगिनींची काळजी घेतली जाते. त्यांच्यातील गुप्तरोगा संबंधी वेळीच काळजी घेतल्याने नगर जिल्ह्यातील देहविक्री करण्यार्य महिलांच्यातील गुप्तरोगाचे प्रमाण शून्य झाले आहे हेच स्नेहालायाचे यश म्हणता येईल. 



स्नेहालयाने नव्या नव्या प्रकल्पातून शोषित -वंचित समाज समूहाच्या परिवर्तनाचा ध्यासच घेतला आहे. स्नेहालयाने दोन वर्ष पूर्वी कम्युनिटी रेडीओ ची स्थापना केली आहे. या रेडीओ वाहिनीने अल्पावधीतच गरजू आणि हक्क वंचित बांधवांचा  आवाज बनली आहे. 
स्नेहालय हिम्मात्ग्राम प्रकल्पातून आता एच आई व्ही एड्स बाधित कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. हिम्मत ग्राम प्रकल्प ४० एकर परिसरात बहरत आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, व्यावसायिक प्रशिक्षण यातून या बांधवांचे भगिनींचे आयुष्य फुलणार आहे. 
नव नवीन समाज प्रकल्पाद्वारे समाजाच्या शेवटच्या  घटकापर्यंत मुलभूत जीवनमानाचा स्तर घेऊन जाणे हेच स्नेहालायचे एकमेव ध्येय  आहे. या सेवा कार्याची पूर्ती स्नेहालयकडून होत आहे. 

गरज सक्रीय पाठबळाची 
Jay Hind ! (15 August - independence day)

स्नेहालय च्या प्रकल्पांना कार्यकर्त्यांना भेटल्यावर आपल्यातील सेवाभाव जागा होतो. बोथट जाणीवा अंकुरतात आणि जगण्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहू लागतो. स्नेहालय हि एक शोषणमुक्त सामाजनिर्मितीची चळवळ आहे. प्रत्येक उंबऱ्याला तिचा स्पर्श झाल्यावाचून त्या चळवळीच्या उद्दिष्टांची पूर्तता अशक्य आहे. स्नेहालयाच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन आपण जिथे राहता त्या परिसरातील बांधवांना आपल्यातील सहयोगाचा हात देणे गरजेचे आहे. परिवर्तन  हे काही केवळ वैचारिक  मंथनातून  शक्य नाही. प्रत्येक वैचारिकतेला कृतीची जोड असल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. स्नेहालयची हीच कृतिशीलता उद्याच्या नव भारत निर्माणासाठी महत्वपूर्ण बनेल अशी खात्री वाटते. 

Tuesday, 19 June 2012

Satymev Jayatene Vadhavila Nagarchya Snehalayache Hurup


Satyamev...helps Ahmednagar NGO


Satyamev...helps Ahmednagar NGO
Supriya Shelar
Tuesday, May 15, 2012 AT 11:35 AM (IST)
PUNE: Ahmednagar-based NGO Snehalay has expressed its gratitude to TV show 'Satyamev Jayate' and actor Aamir Khan, as the fund of Rs 62 lakh raised by this show has come as a timely help for the noble cause of 'saving girl child ' and also to its project' Himmatgram'-- for empowering HIV positive people.

On behalf of 'Snehalaya', its director Dr Girish Kulkarni received the donation from Khan on Friday last week and thanked the donors.

Snehalaya has been working for the past 23 years for the welfare of sex workers in the red light area of Ahmednagar. It has expanded its work for the sex workers' children, HIV-affected people, deserted women and orphans. It also runs 'Childline,' a helpline for children in distress.

“It was really encouraging for our volunteers to  receive such a huge donation. An amount of Rs 5 lakh was generated through Airtel SMSes, while Rs 26 lakh was donated by donors across the country. An equal amount of Rs 31 lakh was contributed by Reliance Foundation. The donors can donate to Snehalaya for next two months via the foundation,” said Prajkata Kulkarni, one of the founder members.

Snehalaya will spend a major part of the donation for its campaign against female foeticide. “Many NGOs conduct awareness programmes for saving the girl child. However, our campaign is different. We appeal emotionally to the villagers, conduct programmes and motivate them to respect the girl child. Then, we certify the villages, putting ethical pressure on them,” she added. The organisation will also produce a documentary on the issue.

The 'Snehankur Adoption Centre' receives large number of premature, underweight female children. The money will be used to establish a basic care unit, with all medical facilities. The remaining sum will help them in developing 'Himmatgram.’

“It's a different attempt of bringing such people into the mainstream. These people are under depression. By group support, they will be rehabilitated in agro-based industries,” she added.   

THE EXPENDITURE
The money will be used to establish a basic care unit for female children. The remaining sum will help in developing 'Himmatgram,' offering a life of dignity to HIV positive people.

Muli Vachava Ani Palanyat Sodava - Snehankur










Saturday, 16 June 2012

राष्ट्रपती संसद ठरवेल, मी नव्हे!


राष्ट्रपती संसद
ठरवेल, मी नव्हे!
सुरेश मैड अहमदनगर। दि. १५ (प्रतिनिधी)
देशाचा भावी राष्ट्रपती कोण असावा हे संसद ठरवेल. मी ठरवणारा कोण? पण हे देशाचे सर्वोच्च पद आहे त्यामुळे या पदावर चारित्र्यवान, हुशार व सुशील नागरिक असावा अशी माझी भूमिका आहे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. तसेच जनलोकपालच्या लढय़ासाठी राज्यानंतर आता देशाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
अण्णांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आज(दि.१५) सकाळी स्नेहालय येथे उपेक्षित वंचित मुलांबरोबर साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अण्णा बोलत होते.
ते म्हणाले, महापुरुषांनी जे बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. ते अधुरेच आहे. ते काहीसे करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. आज विषमतेची दरी प्रचंड वाढत आहे. गरीब-श्रीमंत हा भेद कमी व्हायला हवा.
निसर्ग व मानव दोघांचेही शोषण सुरूच आहे. ते थांबले पाहिजे. जनलोकपाल चळवळीबाबत बोलताना अण्णा म्हणाले, शासन हे विधेयक आणण्याची टाळाटाळ करीत आहे ते चूक असून आता मी जनजागृतीसाठी देशाचा दौरा करणार आहे व त्यानंतर याबाबत दिशा ठरविली जाईल, असे अण्णा हजारे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्नेहालय संस्थेने त्यांचा मानपत्र देऊन आज गौरव केला. यावेळी शिक्षणतज्ज्ञ मामा कौंडिण्य, आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार आदी उपस्थित होते.

सुप्रिया ताईंची सुळे'स्नेहालया'स स्नेहभेट..


ताईंची 'स्नेहालया'स स्नेहभेट..
■ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नगरमधील स्नेहालय संस्थेस भेट देऊन तेथील अनाथ बालकांशी संवाद साधत त्यांना गुलाबपुष्प दिले. यावेळी चिमुरड्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले.



सामान्यांच्या पोरींना संधी
राष्ट्रवादी लई भारी !
प्रारंभी टेलीफिल्मव्दारे युवतींनी या संघटनेशी का जोडले जावे? याची माहिती दाखविण्यात आली. त्यानंतर सुळे यांचे व्यासपीठावर आगमन होताच अनेक गुलाबी फेटे परिधान केलेल्या युवतींनी व्यासपीठावर 'नवी दिशा नवी उभारी राष्ट्रवादी लई भारी' या गीतावर ठेका धरला. त्यावेळी सुप्रियाताईंनाही या युवतींबरोबर ताल धरण्याचा मोह आवरला नाही. यावेळी श्रध्दा धूत,श्रेया भालेराव, माधुरी लोंढे, प्रियंका जगताप, किरण म्हस्के, सुषमा चव्हाण, तृप्ती मगर या युवतींनी मनोगत व्यक्त केले. आयमन इनामदार या चिमुरडीने स्त्रीभ्रूणहत्येवर सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाने सार्‍यांनाच हेलावून टाकले. अहमदनगर। दि. १४(प्रतिनिधी)
पक्ष म्हणजे राजकारण व राजकारण म्हणजे तिकीट हा समज चुकीचा आहे. समाजप्रबोधन व परिवर्तनाची ताकद ही सत्तेपेक्षा अधिक असते यावर आमचा विश्‍वास आहे. पुढार्‍यांच्या पोरींना नव्हे तर सर्वसामान्य घरातून आलेल्या व राजकीय पाठबळ नसलेल्या मुलींना संघटनेच्या माध्यमातून पाठबळ दिले जाईल असा विश्‍वास राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रमुख संघटक खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा युवती मेळावा आज दुपारी सहकार सभागृहात झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. मेधा कांबळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे, सदस्या प्रतिभाताई पाचपुते, अँड. शारदा लगड, निर्मला मालपाणी, डॉ. क्रांतीकला अनभुले, गुलनाझ इनामदार, भगिरथी शिंदे आदी उपस्थित होत्या.
सुळे म्हणाल्या, कुणाच्याही घरात कौटुंबिक हिंसाचारातून महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी प्रथम राष्ट्रवादी युवती संघटना पुढे राहिल. मुलींची छेडछाड विरोधी हेल्पलाईन जी मुंबईत सुरू झाली आहे ती संपूर्ण राज्यभर सुरू करण्यात येणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणायचा आहे. आगामी काळातला महाराष्ट्र घडवायचा आहे. या युवतीतूनच उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व तयार होणार आहे.
पिचड म्हणाले, ही संघटना स्थापनेचा हेतू राजकीय नाही तर सामाजिक आहे. या व्यासपीठावरुन महिला सबलीकरणाची चळवळ उभी राहिल. महिलांच्या अन्यायाच्या विरोधात ही संघटना उभी राहिली. आदिवासी समाजात महिलांना मानाचे स्थान आहे पण ते सुशिक्षित समाजाला कळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेलार यांचेही यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक डॉ. मेघा कांबळे यांनी तर स्वागत शहराध्यक्ष राजश्री मांढरे यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले. राजू शेख

ब्रिटिश संसदेत अण्णांचा सन्मान...स्नेहालय'चा विस्तार सर्वत्र व्हावा


Published on 16 Jun-2012
ब्रिटिश संसदेत अण्णांचा सन्मान
ब्रिटिश संसदेत अण्णांचा सन्मान 
अण्णा हजारे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नगर येथील स्नेहालय संस्थेत त्यांची ग्रंथतुला करण्यात आली छाया : कल्पक हतवळणे 
राष्ट्रपतिपदाचा उमेदवार चारित्र्यसंपन्न असावा
4 राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च् व पवित्र पद आहे. राष्ट्रपती निवडीचा अधिकार संसदेला असला तरी या पदाचे सर्वांनीच पावित्र्य जपले पाहिजे. त्याच्या निवडीसाठी राजकारण टाळायला हवे. राष्ट्रपतिपदासाठीचा उमेदवार राजकीय पार्श्वभूमी नसलेला, चारित्र्यसंपन्न, लोकतंत्राची माहिती असणारा व समाजाशी नाळ जोडलेला असणे गरजेचे आहे.' अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>कर्तृत्वाची दखल, सदस्य बॅरी गार्डिनर यांचे अण्णांना पत्र 
प्रतिनिधी । नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कर्तृत्वाची ब्रिटिश संसदेने दखल घेतली आहे. 17 जुलै रोजी त्यांचा 'फेन्नर ब्रॉकवे'मेडल देऊन ब्रिटिश संसदेत सन्मान करण्यात येणार आहे. त्या वेळी अण्णा जनलोकपालसाठी सुरू असलेल्या लढय़ाची माहिती देणार आहेत.

अण्णांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मजूर पक्षाच्या लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे ब्रिटिश संसद सदस्य बॅरी गार्डिनर यांनी तसे अधिकृत निमंत्रण 16 मे रोजीच पाठवले आहे. त्याचा स्वीकारही अण्णांनी केला.

असे आहे ब्रिटिश संसद सदस्याचे पत्र

लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया ही मजूर पक्षाची संस्था भारतीय व ब्रिटिश संसद सदस्यांतील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी काम करते. भारत हा उगवती महासत्ता आहे, हे ओळखून असलेल्या मजूर पक्षाच्या धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. परस्पर राजकीय संबंध अधिक चांगले व्हावेत, यासाठी आम्ही मजूर पक्षाच्या खासदारांना तुम्ही चालवलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची माहिती दिली आहे. आपणास ज्यांच्या नावे मेडल देणार आहोत, ते फेन्नर ब्रॉकवे यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश संसदेत जोरदार आवाज उठवला होता. भारत व ब्रिटन यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी व नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी काम करणार्‍यांना हे मेडल दिले जाते.

ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर व माजी परराष्ट्र मंत्री ज्ॉक स्ट्रॉ हे या पदकाचे आधीचे मानकरी आहेत. आपल्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी येथील संसद सदस्य संवाद साधण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे कार्यक्रमासाठी संसदेत 17 जुलै रोजी दुपारी ब्रिटिश संसदेत सर्वपक्षीय सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही बॅरी गार्डिनर यांनी दिली आहे. 


 
Published on 16 Jun-2012
Share
loading...
 

Surpiya sule Visited Snehalaya ... 15.6.2012


Published on 15 Jun-2012
Share
loading...





Published on 15 Jun-2012
Share
loading...