सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच. महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच. कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो. आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे.
IYfVfe¨¹ff ¦fa¦fZ¨fe IYf½fOXe,
Aû°ff½fe °fWfX³f»¹ff ªfe½ff¨fZ °fûÔOXe ¹ff°fd¨f °fe±ffÊWbX³fe ´fb¯¹f¦fûOXe, Àffa¦f°fe ³ff±f... सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच. महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच. कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो. आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे. |

No comments:
Post a Comment