Tuesday, 20 November 2012

'कवा येणार माझा बाबा?'

'कवा येणार माझा बाबा?' (भालचंद्र बालटे)

भालचंद्र बालटे (author@esakal.com)
Sunday, November 18, 2012 AT 01:45 AM (IST)

स्नेहालयात गेलो की, सगळ्या विभागात जाऊन आल्याशिवाय राहवत नाही. विशेषतः स्नेहालयाचे एक प्रमुख कार्यकर्ते भरत कुलकर्णी बरोबर असतील, तर ते अगदी बारीकसारीक माहिती देतात. तीन-चारशे मुलांचे कपडे धुण्यासाठीचा वॉशिंग प्लॅंट, शिलाई विभागात आलेली शिवणयंत्रं, मुलांसाठी कॉम्प्युटर, शाळेला जाण्यासाठी नवीन बसेस हे सगळं तर पाहायला मिळतं, पण जीव रमतो तो लहान मुलांच्या विभागात. तिथं दाखल झालेले नवीन चेहरे पाहताना मन भरून येतं. भरत या मुलांमध्ये फार लोकप्रिय. तो आला की ती त्याच्या भोवती जमतात. त्याच्याशी बोलतात. कुणी त्याच्या अभ्यासाविषयी सांगतं, कुणी परीक्षा पास झाल्याचं सांगतं, कुणी त्याचा ड्रेस फारच ढगळ किंवा आखूड दिल्याचं सांगतं, कुणी एखाद्या मोठ्या पोरानं मारल्याची तक्रार करतं. मग भरत कुणाचे मार्क चांगले पडल्याबद्दल अभिनंदन करतो, तर कोणाच्या तक्रारी दूर करण्याचं आश्‍वासन देतो. 

"चला आता आपण एड्‌सबाधित मुलांच्या विभागात जाऊ. खरं तर ही मुलं काही वेगळी नसतात, तीही इतर मुलांसारखीच हसत-खेळत असतात. पण काहींचे चेहरे निस्तेज वाटतात; काहींच्या हातापायाच्या काड्या असतात. पण बरीचशी इतर मुलांसारखी! त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवून औषधोपचार करता यावेत म्हणून हा वेगळा विभाग,'' भरत म्हणाला. त्या विभागात गेल्यावरही भरतभोवती गराडा पडला. घरातलं मोठं माणूस बाहेरून घरात आल्यावर मुलं करतात तशाच एकमेकांबद्दल तक्रारी. 

"का रे दशरथ दिसत नाही कुठं?'' भरत मुलांना विचारतो. ती मुलंही इकडं-तिकडं पाहतात. पण तेवढ्यात तो आपली ढगळ चड्डी कमरेवर ओढत येतो आणि त्याच्या पायाला मिठी मारतो. 

"कवा येणार माझा बाबा?'' तो त्याला विचारतो. "अजून चार-आठ दिवस लागतील. ताप आलाय ना त्याला! मग बरं करायला नको का? बरं वाटलं म्हणजे येईल आणि मग दशरथला घेऊन जाईल. त्यानं सांगितलं ना तुला, रडायचं नाही, या मुलांच्यात राहायचं, खेळायचं, शिकायचं. तू नाही ना रडत?'' भरत म्हणाला. "नाही'' मान हलवत दशरथ म्हणाला. 

"मग मी सांगतो हं त्याना तुम्ही लवकर बरे व्हा आणि आमच्या दशरथला घरी घेऊन जा!'' 
"ही काय भानगड आहे. खरंच त्याचे बाबा आजारी आहे का?'' मी स्नेहालयामधून बाहेर पडताना विचारले. 
काय करणार काका! पोरांशी खोटं बोलावं लागतं. ही एड्‌सबाधित मुलं. या विभागातली बहुतेक मुलंही लालबत्ती भागातून आम्ही आणतो. आईला पोटासाठी देहविक्रय करावा लागतो. त्यातून तिला एड्‌स होतो. ही मुलं जन्माला येतात ती एड्‌स घेऊन!'' 
"म्हणजे हा दशरथ?'' मी म्हणालो. 

"नाही. ती दोघं कामगार होती. कोल्हार या गावी लहानशा झोपडीत राहात होती. दोघंही काम करून पोटापुरतं मिळवत होती. पण नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा नडला असावा. अगोदर नवऱ्याला आणि नंतर त्याच्या बायकोला एड्‌स झाला असणार. परिणाम जन्मतःच दशरथ ते दुखणं घेऊन जन्माला आला. 

आता मला दशरथबद्दल सगळीच माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली. म्हणून मी विचारलं. 
"मग दशरथ इथं कसा काय आला.'' 
"ती एक करुण कहाणीच आहे. दशरथला जन्म देऊन काही दिवसांतच त्याची आई वारली. पहिले काही दिवस त्याच्या वडिलांनी किरकोळ काम करून शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या मदतीनं त्याला सांभाळलं. पुढं-पुढं त्याला काम करवेना. शेवटी भीक मागू लागला. तोपर्यंत दशरथ पाच-सहा वर्षांचा झाला होता. मग ती दोघं भीक मागू लागली. झोपडीचं भाडं देता येईना म्हणून तिथूनही त्यांना हाकललं. आपली फाटकी अंथरुणं आणि कटोरा घेऊन कोल्हारच्या स्टॅंडवर आली. भीक मागून दिवस काढू लागली. खाण्याची आबाळ झाली की हा रोग उफाळतो. बाप आजारी पडला. तापानं फणफणला. एकटा दशरथ भीक मागून आणायचा आणि त्याला भरवायचा. देव कशी बुद्धी देतो बघा! सहा वर्षांचं हट्ट करण्याचं, लाड करवून घेण्याचं ते वय; पण त्यालाही कळलं की आता आपल्याला या बापाशिवाय कोणी नाही. तोच एक आधार आहे. बापानं पोराची काळजी घ्यायची तिथं पोरगं बापाची घेत होतं. पाणी आणून पाजत होतं. भीक मागून पहिला घास त्याच्या तोंडात घालत होतं. त्याला जगवत होतं आणि आपणही जगत होतं.'' 

"मग तुम्हाला हे कसं कळलं?'' पाणावल्या डोळ्यांनी मी विचारलं. ""तेच सांगणार आहे. आमच्या स्नेहालयाचे एक आधारस्तंभ ऍड. श्‍याम असावा नाशिकडून येताना त्या स्टॅंडपाशी थांबले तेव्हा दशरथ आला त्यांच्याकडं काही मागायला. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. बाप आजारी असल्याचं कळल्यावर तिकडं जाऊन पाहिलं. आजूबाजूच्या लोकांनी त्यांची कहाणी सांगितली. यांना कोणीही नातेवाईक नाहीत याची खात्री करून त्यांनी त्यांना स्नेहालयात आणलं. वडील अगदीच अत्यवस्थ असल्यानं त्यांना स्नेहालयात ठेवणं शक्‍य नव्हतं, म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर मी ज्या ज्या वेळी येथे यायचो, तेव्हा मला बघितल्यावर दशरथ कुठूनही यायचा आणि मला विचारायचा, "कवा येणार माझा बाबा?' आणि आठ-दहा दिवसांत बरा झाल्यावर येईल आणि मग आमच्या दशरथला घेऊन जाईल एवढं ऐकलं की हसत खेळायला निघून जायचा.'' भरत म्हणाला. 
"पण आता बरी आहे का त्याच्या वडिलांची तब्येत,'' मी विचारलं. 

"तो महिन्यापूर्वीच वारला. पण आता हे कसं सागायचं एवढ्याशा जिवाला? तसा तो इथं रमला आहे. इथल्या सगळ्या कार्यक्रमात भाग घेतो. हुशार आहे. हळूहळू सगळं शिकतो. इतर कोणाजवळही वडिलांची आठवण काढीत नाही. फक्त मला पाहिल्यावरच त्याला त्याच्या वडिलांची आठवण येते आणि मला येऊन बिलगून विचारतो.'' कवा येणार माझा बाबा?'' 

"फक्त तुमच्याजवळच का बरं तो ही गोष्ट विचारतो, इतर कोणाजवळ का नाही?'' मी विचारलं. 
"कारण तो बुद्धीनं फार शार्प आहे. तो आणि त्याचे वडील बरोबरच इथं आले होते. पण इथून मीच त्याच्या वडिलांना स्नेहालयच्या व्हॅनमधून दवाखान्यात पोचवलं. म्हणून तो मलाच हा प्रश्‍न विचारतो.'' आता मलाही, मी जेव्हा स्नेहालयात जातो तेव्हा त्याला भेटल्याशिवाय राहावत नाही. त्याचा निरागस चेहरा पाहिला की हृदय पिळवटतं. बिचाऱ्याचं आयुष्य किती आहे माहीत नाही; पण स्नेहालय त्याची काळजी घेतं. लवकरच त्याला कळू लागेल की, आपल्याला आई-बाप कोणी नाहीत. आता स्नेहालय हेच आपले आई आणि बाबा. हे लक्षात येईल तेव्हा तो कोणालाच विचारणार नाही, "कवा येणार माझा बाबा?' एड्‌सच्या रोगाची शिकार झालेली ती मुलं. त्यापैकीच दशरथही एक. बिचाऱ्याला आपलं आयुष्य किती आहे हे माहीत नाही. ज्या वयात लाड करून घ्यायचे त्या वयात कळतेपणानं त्यानं वडिलांना जगवलं. आता वडिलांची वाट बघत तो दिवस कंठत आहे. मदतीसाठी ः भरत कुलकर्णी, स्नेहालय भवन, महात्मा गांधी मैदान, नगर- 414 001. संपर्क ः 9011020176. 

Thursday, 8 November 2012

Rashtrapatichya Haste Snehalaya Award

http://epaper.esakal.com/Sakal/12Nov2012/Enlarge/Ahmednagar/AhmednagarToday/page2.htm

Saturday, 3 November 2012

Trunmul Sevakaryacha Adarsh : Snehalaya

Date 16 octber 2012 Vardhapan din
 
After A’nagar, Snehalaya embraces Katraj slum kids

After A’nagar, Snehalaya embraces Katraj slum kids
Kiran Dahitule
Replicating the successful model they initiated in Ahmednagar, NGO Snehalaya launched the unique project, Sharda Balbhavan, in Santoshnagar slums in Katraj on October 2.
Abhishek Shejual, public relation officer (PRO) of the NGO, said, “We surveyed 300 families in the slums of Santoshnagar, and found a large number of children whiling away their lives. It’s easy for these children, who are on their own for most part of the day when their parents are away at work, to enter into wrong company and go astray. So, we decided to set up a study centre and Sanskar classes for them.”
Snehalaya, which successfully runs 13 projects in Ahmednagar, has engaged 23 youths, who were into stealing, as volunteers to work for the slum children.
With counselling, these boys and girls who were into petty stealing have now devoted their lives to training the slum children in various activities to improve their lives.
At Sharda Balbhavan, parents are counselled to send their children to schools rather than to work, thus ensuring to minimise the school dropout rate.
Girish Kulkarni, founder, said, “Abject poverty has made these slums a breeding ground for diseases and other social evils such as child labour and addictions. Snehalaya is actively working in these slums for their improvement and rehabilitation.”
At Balbhavan, activities such as playgroups, tuition, health check-up camps are conducted for creating awareness about communal harmony, good health and consequences of addictions. Their centres are well-equipped with audio-visual and other educational aids for children to get recreational learning, mind stimulation and personality development, so that child labour, child marriages and commercial exploitation of children in slums is reduced.
The NGO has also planned to start women’s self-help groups to enable women in slums to become financially independent, so that they don’t fall prey to unauthorised moneylenders.
d_kiran@dnaindia.net

Published Date:  Oct 10, 2012

Friday, 2 November 2012

Nisvarth Sevabhav

भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला. शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या. मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे. vandana.d@dainikbhaskargroup.com
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 

शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान

Sevavrati

सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्‍या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच. महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच. कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्‍या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो. आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे.
IYfVfe¨¹ff ¦fa¦fZ¨fe IYf½fOXe,
Aû°ff½fe °fWfX³f»¹ff ªfe½ff¨fZ °fûÔOXe
¹ff°fd¨f °fe±ffÊWbX³fe ´fb¯¹f¦fûOXe, Àffa¦f°fe ³ff±f...
सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्‍या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली.
रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच.
महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच.
कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्‍या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो.
आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे. 