Friday, 25 November 2011

snehalaya sanchlit Snehakur Adoption Center - Ahmednagar


दुरावलेल्या मुलीला साडेचार महिन्यांनी भेटली आई


' स्नेहालय संचलित स्नेहाकुर ' ने घडविली भेट; दोन वर्षाच्या चिमुरडीची सुन्न करणारी कथा 
सकाळ वृत्तसेवा 
नगर ता. २४/११/२०११ 
            आई वडिल्यांच्या भांडणामुळे दुरावलेली दोन वर्षांची अक्षदा स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या चिवट प्रयन्ता मुळे तिच्या आईला साडेचार महिन्यांनी भेटली. त्यांची केंद्रात गळाभेट झाली.  
         आई वडिल्यांच्या भांडणामुळे दोन वर्षाची अक्षदाला  देवाच्या भरवश्यावर सोपवून आई वडिल वेगवेगळ्या वाटांनी निघून गेले. आई वडिलांनी मुलीचे देणे घेणे नसल्याने नातेवाकांनी लगेच हात झटकले. त्यामुळे अक्षदाला शेवटी रस्त्यावर यावे लागले. आकाशाचे पांघरून व जमिनीचे अंथरूण करून अक्षदाने २६ जून ते ३ जुलै असे ८ दिवस संगमनेरच्या रस्त्यावर एकटीने काढले. भूक लागल्यावर रस्त्यावर पडलेले काहीही पोटात ढकलून चिमुरडी नातेवाईकाना शोधत होती. संगमनेर पोलीसांना अक्षदा ३ जुलैला सापडली. तिला ताब्यात घेऊन संगोपनासाठी बालकल्याण समितीच्या आदेशाने स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने दाखल करवून घेतले. केंद्राने सर्व माध्यमातून पालकांचा शोध घेतला. पण उपयोग झाला नव्हता. चार महिन्यांनी मनीषा नामदेव कडणर या महिलेने केंद्रात दूरध्वनी करून चौकशी केली. नंतर त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली.
               अक्षदा ची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अक्षदा ला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. मनीषा सध्या एका खासगी रुग्णालयात आया म्हणून काम करते. पिंपरी निर्मळ (ता. राहता) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी घोरपडे, स्नेहांकुर चे प्रकल्प समन्वयक अजय वाबळे, कुंदन पठारे, देवेंद्र बंब, बाळू वारुळे, संजना चव्हाण, उप संचालक अंबादास चव्हाण, चाईल्ड लाईन चे संचालक राजेंद्र शुक्रे, शरद जाधव, रमाकांत तांबोळी, अनंत झेंडे हे उपस्थित होते. 

दुरावलेल्या माय - लेकींची स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने भेट घडवून आणली

No comments:

Post a Comment