Saturday, 19 November 2011

Child Day


snehalaya news, lokamat news paper, date 15/11/2011

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा जन्मदिवस व बालदिन नगर शहरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बालदिनाच्या निमित्ताने लोकमतने दिलेल्या बालदिन विशेषांकाचे सर्व शाळांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांंनी या विशेषांकाचे सामूहिक वाचन केले. आपला आवडता कलाकार शाहरुख खान याने अतिथी संपादकाच्या भूमिकेत मांडलेले बालकांविषयीचे विचार शालेय मुलांना चांगलेच भावले. मुलांबरोबरच शिक्षक व पालकांनीही या अंकाचे कौतुक केले. क्षितिजाला गवसणी घालण्याचे बळ पंखात भरु द्या, अशी साद घालत शहरातील झोपडपट्टयातील मुलांनी साजरा केलेला बालमहोत्सव लक्षवेधी ठरला.
चाईल्डलाईन-बालभवन
उद्याच्या उज्ज्वल भारताची स्वप्ने केवळ उच्च वर्गाच्या पिढीवर नव्हे तर तळागाळातील समाजामधील उगवत्या पिढीच्या बळावर पूर्ण होऊ शकेल व दुर्दम्य आशावाद जागृत ठेवत आज बालदिनी स्नेहालय संचलित बालभवन-चाईल्ड लाईन व रोटरी सेंट्रलच्या बालमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी, रोटरीचे उपप्रांतपाल शंकर आस्वार, सेंट्रलचे अध्यक्ष निर्मल गांधी,सचिव अमृत कटारिया, बालभवनचे हानिफ शेख, चाईल्डलाईनचे दत्ता पांचाळ आदी उपस्थित होते. बालकांनी हवेत फुगे सोडून या महोत्सवाचा शुभारंभ झाला.
यावेळी आकर्षक ढोल व झांज पथक, कसरतीचे खेळ, बालकांचे हक्क दर्शविणारे फलक व देशप्रेमी घोषणा देत नगर शहरातील मुख्य रस्त्यावरुन ही रॅली मोठय़ा उत्साहात मार्गस्थ झाली. त्यानंतर जिल्हा मराठा सांस्कृतिक भवनात दिवसभर चाललेल्या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, जादूचे प्रयोग, बालकांसाठी कार्य केलेल्यांचा गौरव समारंभ झाला.
या महोत्सवात नगरच्या सात झोपडपट्टयातील बालभवनमधील सुमारे ७00 बालके सहभागी झाले होते. सायंकाळी भुईकोट किल्ल्यातही बालभवनच्या बालकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

No comments:

Post a Comment