 |
|
महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात लोकमत कार्यालयात आज झालेल्या संवादसत्रात सहभागी सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, डावीकडून अनिल गावडे, दिलीप औटे, उजवीकडून ऐश्वर्या सागडे, ऋषाली पठारे, शिल्पा केदारी, ऋषाली भालेराव, प्रियंका सातपुते आणि तहसीलदार भारती सागरे. अहमदनगर। दि. २७ (प्रतिनिधी) महिला व तरुणींची छेडछाड होत असेल तर त्याकडे आता दुर्लक्ष करु नका. महिला व तरुणींनी याबाबत तक्रार करण्यासाठी पुढे यावे. पोलीस प्रशासन व सामाजिक संघटना भक्कमपणे अशा महिलांच्या पाठिशी राहतील. पोलीस व समाजाच्या सामुदायिक ताकदीतूनच अत्याचार करणार्यांना दहशत बसू शकेल, असा सूर 'लोकमत'ने आयोजित केलेल्या संवादसत्रात आज निघाला. प्रत्येक महाविद्यालयात तरुणींच्या सुरक्षेसंदर्भात समित्या स्थापन करणे तसेच प्रत्येक गावात 'नारी सुरक्षा दल' स्थापन करणे असे पर्याय या संवादसत्रातून पुढे आले. 'महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल?' या विषयावर 'लोकमत' कार्यालयात आज संवादसत्र आयोजित करण्यात आले होते. सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, तहसीलदार भारती सागरे, 'स्नेहालय'चे अनिल गावडे, शिल्पा केदारी, चाईल्ड लाईनचे दिलीप औटी, वृषाली भालेराव, ऐश्वर्या सागडे, वृषाली पठारे यासह छात्रभारतीच्या कार्यकर्त्या प्रियंका सातपुते यांनी या संवादसत्रात सहभाग घेतला. महिला व तरुणींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्या तरी त्याला समाजातील केवळ पुरूषी संस्कृतीच जबाबदार नसून तरुणीही जबाबदार आहेत. अत्याचार करणार्यांविरोधात तक्रारी होत नाहीत म्हणून या लोकांचे बळ वाढत आहे. घरातूनच पाठबळ नसल्यामुळे अनेकदा तरुणी बोलत नाहीत. छेडछाडीच्या पद्धतीही आता बदलत आहेत. केवळ रस्ता,बस, कॉलेजातच नाही तर कामाच्या ठिकाणी व मोबाईलद्वारेही छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत असे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले. महिला व तरुणी धीटपणे पुढे आल्यास त्यांना पोलीस पूर्णत: सहकार्य करतील, असे सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले. पोलिसांनी छेडछाडीविरोधात पथक स्थापन केले असून प्रत्येक तालुक्यातील पोलीस अधिकार्याच्या नियंत्रणाखाली अत्याचार रोखण्यासाठी समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती यावेळी सिंग यांनी दिली. प्रारंभी 'लोकमत'चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख अनंत पाटील, मुख्य उपसंपादक सुधीर लंके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संदीप रोडे यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास ढोले यांनी आभार मानले. सुरेश वाडेकर, अशोक निंबाळकर, सुदाम देशमुख, चाँद शेख यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. ॅ संबधीत बातमी हॅलो ३ वर ■ कॉलेजमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक. ■ पालक, शिक्षक व संस्था संचालकांच्या दरमाह बैठका व्हाव्यात. ■ पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या धर्तीवर नारी सुरक्षा दल स्थापावे. ■ प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला संरक्षण समिती असावी. ■ महिला छेडछाड विरोधी पथक कार्यान्वित करावे. ■ शाळा, कॉलेज सुटताना बीट मार्शल पथकाने फेरी मारावी. ■ कॉलेजात मुलींच्या तक्रारी ऐकण्यासाठी नियमित बैठका व्हाव्यात. ■ तरुणांना छेड काढण्याची संधी मिळेल असे वर्तन तरुणींनी टाळावे. ■ छेडछाड करणार्याचा मोटारसायकल नंबर घेऊन तो पोलिसांना सांगावा. ■ छेडछाड करणार्याला बदडून पोलिसांच्या हवाली करा. ■ गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षेच्या दृष्टीने माघार घेऊ नका. ■ कायद्याने त्याला हवी ती शिक्षा मिळतेच. ■ मोबाईलवर छेडछाड झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा. ■ पोलीस व न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेऊन रोमिओंविरुध्द आक्रमकपणे रस्त्यावर उतरा. ■ चाईल्ड लाईन व स्नेहालय या स्वयंसेवी संस्थेला कळवा. ते तुमची मदत करतील. ■ छेडछाड होत असेल तर पोलिसांना ८६९८७९१९१९
|
No comments:
Post a Comment