Wednesday, 25 April 2012

स्नेहालय संस्थेतील आश्रम कन्यांचा विवाह सोहळा दिमाखात संपन्न

स्नेहालय संस्थेतील आश्रम कन्यांचा 
विवाह सोहळा दिमाखात संपन्न 

दैनिक लोकमंथन : 

Rekha and Swapnil
Priya and Deepak
अहमदनगर, 


डावीकडून बापुजी, गिरीश सर, विठ्ठल राव सोसे,
 रेखा व स्वप्नील,मिलिंद सर, प्रिया व दिपक
Participants
दिनांक २३/०४/२०१२ रोजी स्नेहालय संस्थेच्या चि. सौ. का. प्रिया व चि. सौ. का. रेखा यांचा विवाह सोहळा आज स्नेहालय संस्थेच्या पुनर्वसन संकुलात दिमाखात संपन्न झाला. रेखाने आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर परिचारिकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मागील २ वर्षापासून ती नगरमधील एका नामांकित खाजगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करते. रेखाचे पती स्वप्नील दीपक पाथरकर यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. प्रियाने १२ वी नंतर होम सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिचे पती दीपक शिवाजी गलांडे, श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीत काम करीत करतात.  

     वधू वरांना आशिर्वाद देण्यासाठी स्नेहालय परिवारातील १०० सदस्य उपस्थित होते. वैदिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सौ. सिंधू आणि धर्मराज शंकर औटी आश्रम कन्यांचे कन्यादान केले. 
यावेळी सर्वश्री बेहराम नगरवाला, अशोक कुरापट्टी, दिलीप अकोलकर, सुवालाल शिंगवी, मिलिंद कुलकर्णी, प्रवीण मुत्याल, राजीव गुजर, राजेंद्र शुक्रे, संजय बंदिष्टी, विठ्ठलराव सोसे, सौ. मोहिनी जाधव, हनीफ शेख, दिपक काळे, आदि मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. श्री क्षेत्र धरमपुरी आणि ह.भ.प. दत्तात्रय अण्णा कोतकर यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न झाला.

      जाती आणि धर्म न पाहता आश्रम कन्यांशी विवाह करू  इच्छिणाऱ्यानी ९०११०२०१७६, ९९२१२७३३२० या क्रमांकार संपर्क करण्याचे स्नेहालय संस्थेने आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment