Sunday, 30 December 2012

तक्रारी घरातच दडपू नका

तक्रारी घरातच दडपू नका
मानसिकता बदला

मुलींना धीट बनविण्याची गरज आहे. मुलींपेक्षा मुले सुधारणे गरजेचे आहे. अनेक मुले मजा म्हणून छेडतात. सार्वजनिक ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत. आपण मुलींना बळकट केले पाहिजे, असे म्हणतो त्यावेळी मुलांना संस्कारीत केले पाहिजे,याकडे दुर्लक्ष करतो. मुलांना शिस्त हवी आहे. मुलींकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलण्याची व ती सात्विकतेकडे नेणे गरजेचे आहे.
-ऐश्‍वर्या सागडे (विद्याथिर्नी)समाजाकडून सहकार्य अपेक्षित
पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांच्या बाबत बोलणं, वागणं, वावरणं सगळं काही लादलं गेलेलं आहे. महिलांना स्वातंत्र्य राहिलेले नाही. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या, रस्त्यावर मारा अशा नुसत्या मागण्या करून काहीही उपयोग होणार नाही. एखादी घटना घडली की अशी आंदोलने होतात. महिलांवर अत्याचार होणार नाही, यासाठी समाजाकडून सहकार्य अपेक्षित आहे. पुरुष व मुले रिक्षामध्येही चुकीच्या पद्धतीने बसतात. जेणेकरून मुलींना त्रास होईल. स्कार्प बांधल्यामुळे संशय घेण्याचे कारण नाही. सर्वच मुली आपले कृत्य लपविण्यासाठी स्कार्प बांधतात, असे मुळीच नाही.
- प्रियंका सातपुते, कार्यकर्ती छात्रभारती. महिला अत्याचार व्यापक स्वरुपात आहे. महिला अत्याचाराविषयी संवेदना निर्माण झाली ही खरी परिवर्तनाची सुरुवात आहे. मात्र कृती ही महत्त्वाची आहे. घटना का घडतात?, प्रशासन हतबल होते, तेंव्हा चळवळीच सक्षमतेने काम करू शकतात. ज्यावेळी राजकीय लोक, कार्यकर्ते गुन्हे करतात, त्यावेळी समाजाची भूमिका महत्त्वाची असते. आजकाल समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत. घटना घडली तर आधी गुन्हेगाराला चोप द्या, नंतर पोलिसांच्या हवाली करा. स्वत:ची जबाबदारी प्रत्येकजण विसरला आहे. घटना घडतात तेव्हा समाज समोर येणे गरजेचे आहे. छेड काढली तर जागेवर फटके देण्याची गरज आहे. नंतर कृती करताना ते दहावेळा विचार करतील. 'चाईल्ड लाईन'कडे तक्रार आल्यास आम्ही अशा छेडछाडी करणार्‍यांचा 'ट्रॅप 'लावून शोध घेतो व त्यांना कायद्याने धडा शिकवितो. त्यामुळे तक्रारी करा. समाजाची मानसिकता तयार करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. कोणी छेड काढली तर रस्ता बदल असा घरातून उपदेश दिला जातो. अत्याचारित महिलेला समाज किती स्वीकारतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एका महाविद्यालयाने माझी रॅगिंग विरोधी समितीवर नियुक्ती केली आहे. मात्र मला त्यांनी एकदाही बैठकीला बोलविले नाही. मग आम्ही कृती कशी करायची? या कागदी समित्या काय कामाच्या? 'पालकांशी संवाद' असा उपक्रम घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.
-अनिल गावडे, समन्वयक स्नेहालय शासकीय कार्यालयामध्ये महिलांची संख्या खूप आहे. त्यांना कामाचा ताण खूप आहे. काम करण्याची महिलांची इच्छा खूप असते. मात्र त्यावर एक महिला म्हणून र्मयादा येतात. ज्यावेळी काम जास्त असते, अशावेळी रात्रीही थांबून काम करण्याची त्यांची इच्छा असते. मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महिला अधिकारी कार्यक्षेत्रावर जाऊन धडक कारवाईही करतात मात्र अशावेळी नाही म्हटले तरी त्यांना थोड्या र्मयादा येतात. दुचाकीवरून जाणारी माणसं महिलांना बघून अनेकवेळा गुटखा, पान खाऊन थुंकतात. हा पुरुषी मानसिकतेचा विकृत प्रकार आहे. म्हणूनच महिलांनी पुढे आले पाहिजे. महाविद्यालयात पोलीस पथक पाठवून मुलांवर धाक निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांना घरातून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे. बदलाची सुरुवात दुसर्‍यापासून व्हावी, ही समाजाची मानसिकता आहे. स्वत:पासून बदल व्हावा, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. मुलीला बळकट केले पाहिजे. तीला स्वतंत्र जगू द्या. मुलीला स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवायला पाहिजे. तशी हिम्मत तिला द्यावी.
-भारती सगरे (तहसीलदार -अन्नधान्य वितरण) पोलिसांनी खच्चीकरण करू नये
काही गोष्टींना प्रसारमाध्यमांनी महत्त्व दिले आहे. जाहिराती,मालिकांमुळे समाज बिघडतो आहे. आम्ही चाईल्ड लाईनच्या माध्यमातून पोलिसांकडे गेलो तर त्यांच्याकडूनच आम्हाला ऐकून घ्यावे लागते. तुम्ही पेपरबाजी करता, कागदी घोडे नाचविता, असे आम्हाला पोलीस सांगतात. चाईल्ड लाईनची पोलिसांना माहिती नसावी, हे किती वाईट आहे. १0९८ या क्रमांकावर फोन केला तरी आम्ही छेडछाडीच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच कारवाई करतो.
-दिलीप औटी (संचालक, चाईल्ड लाईन)

पालकांनी मुलांना विश्‍वासात घेतले पाहिजे.
छेडछाड केल्यानंतर मुली घाबरतात. त्या घरी सांगत नाहीत. घरी कळाले तर आपल्यालाच त्रास होईल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळेच छेडछाडीबाबत काही सांगितले तर पालकांनी त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामागे पाठबळ उभे केले पाहिजे. छेडछाड झाल्यानंतर अनेक मुली, आई-वडील खचतात. असे होऊ नये.
-वृषाली भालेराव (स्नेहालय प्रकल्प)

शाळा-महाविद्यालयात समिती असावी
छेडछाड, अत्याचार यामध्ये माणसाची वैचारिक पातळी किती खालावली आहे, याचे चित्र स्पष्ट होते. मुलीला भीती असते. त्यांना करिअर असते. त्यामुळे ती सर्व सहन करते. प्रतिकार केला तर अत्याचार होतो, अशी मुलींची मानसिकता असते. त्यामुळे छेडछाड झाली तर त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शिक्षक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक यांची मिळून एखादी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ही टीम कौन्सिलिंग पातळीवर कार्यरत असावी. चारित्र्यावर संशय घेणारी अनेक प्रकरणे आमच्यासमोर येतात. अशी प्रकरणे गैरसमजुतीमधून निर्माण झालेली असल्याचे समोर येते. गैरसमजुती या सभोवतालच्या वातावरणातून निर्माण होतात. त्यातून संशय निर्माण होतो. संशय घेणे हा एक छळाचाच प्रकार आहे.
- शिल्पा केदारी (स्नेहाधार प्रकल्प)

मुलांना सुधारणेही आवश्यक
कोणत्याही घटनांना मुली बळी पडतात. यामध्ये त्यांचा दोष नाही. मुलींना बळकट केले पाहिजे. मात्र मुलांना सुधारण्यासाठी त्यांचे पालक कधी प्रयत्न करणार? हाही खरा मुद्दा आहे. मुले सुसंस्कारित झाली, तर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये छेडछाडीच्या घटना होणार नाहीत. छेडछाड करावयाच्या मुलांच्या पद्धती वेगवेगळ्य़ा आहेत. रोजच्या नवीन असतात. ठराविक मुलगा ठराविक मुलीचीच छेड काढतोय, हेही स्पष्ट होत नसल्याने तक्रार कोणाविरुद्ध करायची?असाही प्रश्न रस्त्याने जाणार्‍या, महाविद्यालयातील मुलींना पडतो.
-वृषाली पठारे (महाविद्यालयीन विद्यार्थी) अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी कायदेशीर तक्रार करणे व न्यायालयातही खंबीर राहणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. महिला धीटपणे पुढे आल्या तर शंभर टक्के अत्याचार करणार्‍यांचा बंदोबस्त होईल. अत्याचार करणार्‍यांना महिलांनी व समाजाने सामुहिकपणे झोडपणे हा पर्याय दहशत बसविण्यासाठी चांगला आहे. परंतु तो कायदेशीर मार्ग नाही. अशा आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांना गुन्ह्याचे पुरावे जमा करण्यासाठीही समाजाने मदत करण्याची आवश्यकता आहे. महिलांवर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अत्याचार होतात तेव्हा इतर समाज बघ्याची भूमिका का घेतो? हाही प्रश्न आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये छेडछाडीविरोधात नियंत्रण करणार्‍या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये पाल्य व शिक्षक असावेत. मुली स्कार्प का बांधतात? याचाही विचार होणे आवश्यक आहे. प्रदूषण व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्प बांधले जात असेल तर समजू शकते. परंतु अनेक मुली बगीचा, चित्रपटगृहे येथेही स्कार्प बांधून का असतात? यामुळेही अकारण संशय निर्माण होऊन अत्याचार करणार्‍यांचे फावते हे मुलींनीही लक्षात घ्यावे. तरुणांना घाबरुन असे तोंड बांधणे हा काही अत्याचार रोखण्याचा मार्ग होऊ शकत नाही. धीटपणे मुकाबला करायला हवा.
- अँड. सतीष पाटील, जिल्हा सरकारी वकीलएखाद्या वाहन चालकाने, गाडीवरून जाताना कोणी छेडछाड केल्याचे आढळले तर गाडीचा नंबर लिहून तो पोलिसांकडे देणे आवश्यक आहे. अत्याचार जसा अशिक्षिताकडून केला जातो, तसा उच्च शिक्षिताकडूनही केला जातो. छेडछाडविरोधी मोहीम राबवून मुलींमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. तक्रारच आली नाही, तर पोलीस कारवाई करू शकणार नाहीत. म्हणूनच महिला अत्याचाराविरोधात लढायचे असेल तर पहिल्यांदा पोलीसांकडे तक्रार केली पाहिजे. मैत्री (रिलेशनशीप) खुली ठेवावी. रुमाल बांधून मैत्री कशासाठी? तक्रार केली तर साक्षीदार होत नाहीत. पोलिसांना दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतात. मध्यम वयाच्या लोकांकडून जास्त समस्या निर्माण होतात. तक्रार केली तर अत्याचारित मुली-महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठीही पोलीस सहकार्य करतात. लोक आपली जबाबदारी विसरतात आणि पोलिसांवर आरोप करतात. मुलींनी स्कार्प बांधावे की नाही? हे त्यांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे. छेडछाडविरोधी पथक कार्यरत आहेत. तक्रार असेल तर त्यांना कळवा. पण बर्‍याचदा त्रास होऊनही तरुणी, महिला तक्रार करत नाहीत. हे चूक आहे. छेडछाड विरोधी पथकाची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंतही वाढविली जाईल. मोबाईल, क्वाईन बॉक्सवरून अनेकवेळा अश्लिल फोन केले जातात. अशावेळी ज्या क्वाईन बॉक्सवरुन हा फोन आला त्याला जाब विचारा. जेणेकरुन तो दक्ष होईल. ग्रामीण भागात अंधार असलेल्या भागात वीज देण्याबाबत आम्ही प्रशासनाला पत्र दिले आहेत. एखाद्या स्पॉटवर नेहमीच काही घटना घडत असतील तर निनावी पत्र पाठवा. महाविद्यालयामध्ये बीट मार्शल कार्यान्वित करू. दूरचित्रवाहिन्यांवरही नको त्या मालिका बघितल्या जातात. चांगले बघण्याची, वाचण्याची कोणाचीच मानसिकता नसते. नैतिकता ही ज्याची त्याची वेगवेगळी आहे. ती मनामध्ये असते. सुधारणा ह्या लोकांमधूनच घडल्या पाहिजेत. मात्र गुन्हेगारांना धडा मिळालाच पाहिजे. ही जबाबदारी फक्त पोलिसांची नव्हे तर समाजाची देखील आहे.
-ज्योतीप्रिया सिंग(सहायक पोलीस अधिक्षक) मानसिकता बदला
मुलींना धीट बनविण्याची गरज आहे. मुलींपेक्षा मुले सुधारणे गरजेचे आहे. अनेक मुले मजा म्हणून छेडतात. सार्वजनिक ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत. आपण मुलींना बळकट केले पाहिजे, असे म्हणतो त्यावेळी मुलांना संस्कारीत केले पाहिजे,याकडे दुर्लक्ष करतो. मुलांना शिस्त हवी आहे. मुलींकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलण्याची व ती सात्विकतेकडे नेणे गरजेचे आहे.
-ऐश्‍वर्या सागडे (विद्याथिर्नी) समाजाकडून सहकार्य अपेक्षित
पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांच्या बाबत बोलणं, वागणं, वावरणं सगळं काही लादलं गेलेलं आहे. महिलांना स्वातंत्र्य राहिलेले नाही. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या, रस्त्यावर मारा अशा नुसत्या मागण्या करून काहीही उपयोग होणार नाही. एखादी घटना घडली की अशी आंदोलने होतात. महिलांवर अत्याचार होणार नाही, यासाठी समाजाकडून सहकार्य अपेक्षित आहे. पुरुष व मुले रिक्षामध्येही चुकीच्या पद्धतीने बसतात. जेणेकरून मुलींना त्रास होईल. स्कार्प बांधल्यामुळे संशय घेण्याचे कारण नाही. सर्वच मुली आपले कृत्य लपविण्यासाठी स्कार्प बांधतात, असे मुळीच नाही.
- प्रियंका सातपुते, कार्यकर्ती छात्रभारती. महिला अत्याचार व्यापक स्वरुपात आहे. महिला अत्याचाराविषयी संवेदना निर्माण झाली ही खरी परिवर्तनाची सुरुवात आहे. मात्र कृती ही महत्त्वाची आहे. घटना का घडतात?, प्रशासन हतबल होते, तेंव्हा चळवळीच सक्षमतेने काम करू शकतात. ज्यावेळी राजकीय लोक, कार्यकर्ते गुन्हे करतात, त्यावेळी समाजाची भूमिका महत्त्वाची असते. आजकाल समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत. घटना घडली तर आधी गुन्हेगाराला चोप द्या, नंतर पोलिसांच्या हवाली करा. स्वत:ची जबाबदारी प्रत्येकजण विसरला आहे. घटना घडतात तेव्हा समाज समोर येणे गरजेचे आहे. छेड काढली तर जागेवर फटके देण्याची गरज आहे. नंतर कृती करताना ते दहावेळा विचार करतील. 'चाईल्ड लाईन'कडे तक्रार आल्यास आम्ही अशा छेडछाडी करणार्‍यांचा 'ट्रॅप 'लावून शोध घेतो व त्यांना कायद्याने धडा शिकवितो. त्यामुळे तक्रारी करा. समाजाची मानसिकता तयार करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. कोणी छेड काढली तर रस्ता बदल असा घरातून उपदेश दिला जातो. अत्याचारित महिलेला समाज किती स्वीकारतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एका महाविद्यालयाने माझी रॅगिंग विरोधी समितीवर नियुक्ती केली आहे. मात्र मला त्यांनी एकदाही बैठकीला बोलविले नाही. मग आम्ही कृती कशी करायची? या कागदी समित्या काय कामाच्या? 'पालकांशी संवाद' असा उपक्रम घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.
-अनिल गावडे, समन्वयक स्नेहालय शासकीय कार्यालयामध्ये महिलांची संख्या खूप आहे. त्यांना कामाचा ताण खूप आहे. काम करण्याची महिलांची इच्छा खूप असते. मात्र त्यावर एक महिला म्हणून र्मयादा येतात. ज्यावेळी काम जास्त असते, अशावेळी रात्रीही थांबून काम करण्याची त्यांची इच्छा असते. मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महिला अधिकारी कार्यक्षेत्रावर जाऊन धडक कारवाईही करतात मात्र अशावेळी नाही म्हटले तरी त्यांना थोड्या र्मयादा येतात. दुचाकीवरून जाणारी माणसं महिलांना बघून अनेकवेळा गुटखा, पान खाऊन थुंकतात. हा पुरुषी मानसिकतेचा विकृत प्रकार आहे. म्हणूनच महिलांनी पुढे आले पाहिजे. महाविद्यालयात पोलीस पथक पाठवून मुलांवर धाक निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांना घरातून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे. बदलाची सुरुवात दुसर्‍यापासून व्हावी, ही समाजाची मानसिकता आहे. स्वत:पासून बदल व्हावा, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. मुलीला बळकट केले पाहिजे. तीला स्वतंत्र जगू द्या. मुलीला स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवायला पाहिजे. तशी हिम्मत तिला द्यावी.
-भारती सगरे (तहसीलदार -अन्नधान्य वितरण) पोलिसांनी खच्चीकरण करू नये
काही गोष्टींना प्रसारमाध्यमांनी महत्त्व दिले आहे. जाहिराती,मालिकांमुळे समाज बिघडतो आहे. आम्ही चाईल्ड लाईनच्या माध्यमातून पोलिसांकडे गेलो तर त्यांच्याकडूनच आम्हाला ऐकून घ्यावे लागते. तुम्ही पेपरबाजी करता, कागदी घोडे नाचविता, असे आम्हाला पोलीस सांगतात. चाईल्ड लाईनची पोलिसांना माहिती नसावी, हे किती वाईट आहे. १0९८ या क्रमांकावर फोन केला तरी आम्ही छेडछाडीच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच कारवाई करतो.
-दिलीप औटी (संचालक, चाईल्ड लाईन)

पालकांनी मुलांना विश्‍वासात घेतले पाहिजे.
छेडछाड केल्यानंतर मुली घाबरतात. त्या घरी सांगत नाहीत. घरी कळाले तर आपल्यालाच त्रास होईल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळेच छेडछाडीबाबत काही सांगितले तर पालकांनी त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामागे पाठबळ उभे केले पाहिजे. छेडछाड झाल्यानंतर अनेक मुली, आई-वडील खचतात. असे होऊ नये.
-वृषाली भालेराव (स्नेहालय प्रकल्प)

शाळा-महाविद्यालयात समिती असावी
छेडछाड, अत्याचार यामध्ये माणसाची वैचारिक पातळी किती खालावली आहे, याचे चित्र स्पष्ट होते. मुलीला भीती असते. त्यांना करिअर असते. त्यामुळे ती सर्व सहन करते. प्रतिकार केला तर अत्याचार होतो, अशी मुलींची मानसिकता असते. त्यामुळे छेडछाड झाली तर त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शिक्षक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक यांची मिळून एखादी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ही टीम कौन्सिलिंग पातळीवर कार्यरत असावी. चारित्र्यावर संशय घेणारी अनेक प्रकरणे आमच्यासमोर येतात. अशी प्रकरणे गैरसमजुतीमधून निर्माण झालेली असल्याचे समोर येते. गैरसमजुती या सभोवतालच्या वातावरणातून निर्माण होतात. त्यातून संशय निर्माण होतो. संशय घेणे हा एक छळाचाच प्रकार आहे.
- शिल्पा केदारी (स्नेहाधार प्रकल्प)

मुलांना सुधारणेही आवश्यक
कोणत्याही घटनांना मुली बळी पडतात. यामध्ये त्यांचा दोष नाही. मुलींना बळकट केले पाहिजे. मात्र मुलांना सुधारण्यासाठी त्यांचे पालक कधी प्रयत्न करणार? हाही खरा मुद्दा आहे. मुले सुसंस्कारित झाली, तर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये छेडछाडीच्या घटना होणार नाहीत. छेडछाड करावयाच्या मुलांच्या पद्धती वेगवेगळ्य़ा आहेत. रोजच्या नवीन असतात. ठराविक मुलगा ठराविक मुलीचीच छेड काढतोय, हेही स्पष्ट होत नसल्याने तक्रार कोणाविरुद्ध करायची?असाही प्रश्न रस्त्याने जाणार्‍या, महाविद्यालयातील मुलींना पडतो.
-वृषाली पठारे (महाविद्यालयीन विद्यार्थी) बलात्काराच्या प्रकरणात जामीन नको
बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला जामीन मिळायला नको अशीच तरतूद करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
बलात्काराच्या प्रकरणांसाठी कायदा बदलणे, जामीन देण्याची तरतूद कायद्यातून वगळावी, सहा महिने ते एक वर्ष या काळात निकाल लावावा, आरोपीला जेलमध्ये ठेवूनच प्रकरण निकालात काढावे, कलम ३७६ अन्वये स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, अशी मागणी सरकारकडे केली असल्याची माहिती अँड. पाटील यांनी यावेळी दिली. अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी कायदेशीर तक्रार करणे व न्यायालयातही खंबीर राहणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. महिला धीटपणे पुढे आल्या तर शंभर टक्के अत्याचार करणार्‍यांचा बंदोबस्त होईल. अत्याचार करणार्‍यांना महिलांनी व समाजाने सामुहिकपणे झोडपणे हा पर्याय दहशत बसविण्यासाठी चांगला आहे. परंतु तो कायदेशीर मार्ग नाही. अशा आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांना गुन्ह्याचे पुरावे जमा करण्यासाठीही समाजाने मदत करण्याची आवश्यकता आहे. महिलांवर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अत्याचार होतात तेव्हा इतर समाज बघ्याची भूमिका का घेतो? हाही प्रश्न आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये छेडछाडीविरोधात नियंत्रण करणार्‍या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये पाल्य व शिक्षक असावेत. मुली स्कार्प का बांधतात? याचाही विचार होणे आवश्यक आहे. प्रदूषण व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्प बांधले जात असेल तर समजू शकते. परंतु अनेक मुली बगीचा, चित्रपटगृहे येथेही स्कार्प बांधून का असतात? यामुळेही अकारण संशय निर्माण होऊन अत्याचार करणार्‍यांचे फावते हे मुलींनीही लक्षात घ्यावे. तरुणांना घाबरुन असे तोंड बांधणे हा काही अत्याचार रोखण्याचा मार्ग होऊ शकत नाही. धीटपणे मुकाबला करायला हवा.
- अँड. सतीष पाटील, जिल्हा सरकारी वकील एखाद्या वाहन चालकाने, गाडीवरून जाताना कोणी छेडछाड केल्याचे आढळले तर गाडीचा नंबर लिहून तो पोलिसांकडे देणे आवश्यक आहे. अत्याचार जसा अशिक्षिताकडून केला जातो, तसा उच्च शिक्षिताकडूनही केला जातो. छेडछाडविरोधी मोहीम राबवून मुलींमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. तक्रारच आली नाही, तर पोलीस कारवाई करू शकणार नाहीत. म्हणूनच महिला अत्याचाराविरोधात लढायचे असेल तर पहिल्यांदा पोलीसांकडे तक्रार केली पाहिजे. मैत्री (रिलेशनशीप) खुली ठेवावी. रुमाल बांधून मैत्री कशासाठी? तक्रार केली तर साक्षीदार होत नाहीत. पोलिसांना दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतात. मध्यम वयाच्या लोकांकडून जास्त समस्या निर्माण होतात. तक्रार केली तर अत्याचारित मुली-महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठीही पोलीस सहकार्य करतात. लोक आपली जबाबदारी विसरतात आणि पोलिसांवर आरोप करतात. मुलींनी स्कार्प बांधावे की नाही? हे त्यांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे. छेडछाडविरोधी पथक कार्यरत आहेत. तक्रार असेल तर त्यांना कळवा. पण बर्‍याचदा त्रास होऊनही तरुणी, महिला तक्रार करत नाहीत. हे चूक आहे. छेडछाड विरोधी पथकाची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंतही वाढविली जाईल. मोबाईल, क्वाईन बॉक्सवरून अनेकवेळा अश्लिल फोन केले जातात. अशावेळी ज्या क्वाईन बॉक्सवरुन हा फोन आला त्याला जाब विचारा. जेणेकरुन तो दक्ष होईल. ग्रामीण भागात अंधार असलेल्या भागात वीज देण्याबाबत आम्ही प्रशासनाला पत्र दिले आहेत. एखाद्या स्पॉटवर नेहमीच काही घटना घडत असतील तर निनावी पत्र पाठवा. महाविद्यालयामध्ये बीट मार्शल कार्यान्वित करू. दूरचित्रवाहिन्यांवरही नको त्या मालिका बघितल्या जातात. चांगले बघण्याची, वाचण्याची कोणाचीच मानसिकता नसते. नैतिकता ही ज्याची त्याची वेगवेगळी आहे. ती मनामध्ये असते. सुधारणा ह्या लोकांमधूनच घडल्या पाहिजेत. मात्र गुन्हेगारांना धडा मिळालाच पाहिजे. ही जबाबदारी फक्त पोलिसांची नव्हे तर समाजाची देखील आहे.
-ज्योतीप्रिया सिंग(सहायक पोलीस अधिक्षक)

Anil Gawade
Vrusahli Bhalerao
Dilip Auti 
Bharati Sagare
Vrushali Pathare 

Priyanka Satapute

Aishwarya Sagade
Satish Patil
Jyoti Priyasing 
Shilpa Kedari 

अत्याचार रोखण्यासाठी 'नारी दल' चा प्रस्ताव

अत्याचार रोखण्यासाठी 'नारी दल' चा प्रस्ताव
संवादसत्र
लोकमत संवाद सत्रातील मुद्दे
महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात लोकमत कार्यालयात आज झालेल्या संवादसत्रात सहभागी सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, डावीकडून अनिल गावडे, दिलीप औटे, उजवीकडून ऐश्‍वर्या सागडे,
ऋषाली पठारे, शिल्पा केदारी, ऋषाली भालेराव, प्रियंका सातपुते आणि तहसीलदार भारती सागरे. अहमदनगर। दि. २७ (प्रतिनिधी)
महिला व तरुणींची छेडछाड होत असेल तर त्याकडे आता दुर्लक्ष करु नका. महिला व तरुणींनी याबाबत तक्रार करण्यासाठी पुढे यावे. पोलीस प्रशासन व सामाजिक संघटना भक्कमपणे अशा महिलांच्या पाठिशी राहतील. पोलीस व समाजाच्या सामुदायिक ताकदीतूनच अत्याचार करणार्‍यांना दहशत बसू शकेल, असा सूर 'लोकमत'ने आयोजित केलेल्या संवादसत्रात आज निघाला. प्रत्येक महाविद्यालयात तरुणींच्या सुरक्षेसंदर्भात समित्या स्थापन करणे तसेच प्रत्येक गावात 'नारी सुरक्षा दल' स्थापन करणे असे पर्याय या संवादसत्रातून पुढे आले.
'महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल?' या विषयावर 'लोकमत' कार्यालयात आज संवादसत्र आयोजित करण्यात आले होते. सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, तहसीलदार भारती सागरे, 'स्नेहालय'चे अनिल गावडे, शिल्पा केदारी, चाईल्ड लाईनचे दिलीप औटी, वृषाली भालेराव, ऐश्‍वर्या सागडे, वृषाली पठारे यासह छात्रभारतीच्या कार्यकर्त्या प्रियंका सातपुते यांनी या संवादसत्रात सहभाग घेतला.
महिला व तरुणींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्या तरी त्याला समाजातील केवळ पुरूषी संस्कृतीच जबाबदार नसून तरुणीही जबाबदार आहेत. अत्याचार करणार्‍यांविरोधात तक्रारी होत नाहीत म्हणून या लोकांचे बळ वाढत आहे. घरातूनच पाठबळ नसल्यामुळे अनेकदा तरुणी बोलत नाहीत. छेडछाडीच्या पद्धतीही आता बदलत आहेत. केवळ रस्ता,बस, कॉलेजातच नाही तर कामाच्या ठिकाणी व मोबाईलद्वारेही छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत असे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले. महिला व तरुणी धीटपणे पुढे आल्यास त्यांना पोलीस पूर्णत: सहकार्य करतील, असे सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले. पोलिसांनी छेडछाडीविरोधात पथक स्थापन केले असून प्रत्येक तालुक्यातील पोलीस अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली अत्याचार रोखण्यासाठी समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती यावेळी सिंग यांनी दिली.
प्रारंभी 'लोकमत'चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख अनंत पाटील, मुख्य उपसंपादक सुधीर लंके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संदीप रोडे यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास ढोले यांनी आभार मानले. सुरेश वाडेकर, अशोक निंबाळकर, सुदाम देशमुख, चाँद शेख यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. ॅ संबधीत बातमी हॅलो ३ वर ■ कॉलेजमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक.
■ पालक, शिक्षक व संस्था संचालकांच्या दरमाह बैठका व्हाव्यात.
■ पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या धर्तीवर नारी सुरक्षा दल स्थापावे.
■ प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला संरक्षण समिती असावी.
■ महिला छेडछाड विरोधी पथक कार्यान्वित करावे.
■ शाळा, कॉलेज सुटताना बीट मार्शल पथकाने फेरी मारावी.
■ कॉलेजात मुलींच्या तक्रारी ऐकण्यासाठी नियमित बैठका व्हाव्यात. ■ तरुणांना छेड काढण्याची संधी मिळेल असे वर्तन तरुणींनी टाळावे.
■ छेडछाड करणार्‍याचा मोटारसायकल नंबर घेऊन तो पोलिसांना सांगावा.
■ छेडछाड करणार्‍याला बदडून पोलिसांच्या हवाली करा.
■ गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षेच्या दृष्टीने माघार घेऊ नका.
■ कायद्याने त्याला हवी ती शिक्षा मिळतेच.
■ मोबाईलवर छेडछाड झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा. ■ पोलीस व न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेऊन रोमिओंविरुध्द आक्रमकपणे रस्त्यावर उतरा.
■ चाईल्ड लाईन व स्नेहालय या स्वयंसेवी संस्थेला कळवा. ते तुमची मदत करतील.
■ छेडछाड होत असेल तर पोलिसांना ८६९८७९१९१९