Saturday, 25 August 2012

'त्याच्या' अंधार्‍या जीवनात किरण

'त्याच्या' अंधार्‍या जीवनात किरण
श्रीगोंदा। दि. २५ (वार्ताहर)
च्गिवंड्याच्या हाताखाली काम करून मॅकेनिकल इंजिनिअर होण्यासाठी जीवाचे रान करणार्‍या श्रीगोंदा येथील किरण बन्सी दरोडे या विद्यार्थ्यास पुणे येथील अंध मुलांच्या सो कॅन ग्रुप दरमहा बाराशे रूपये पाठवित आहे. त्यामुळे किरणच्या शैक्षणिक जीवनातील किरणप्रकाशमान झाले आहेत.
किरणचे मातृछात्र लहानपणीच हरपले. वडील निरक्षर आठवडे बाजारात मटकी विकण्याचा व्यवसाय करतात. किरणने दहावीपर्यंत शैक्षणिक प्रवास कसाबसा पूर्ण केला. त्यानंतर श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्था अंतर्गत विद्यार्थी सहाय्यता समिती वसतिगृहात सहारा मिळाला. अनंत झेंडे व विकास पाटील यांनी करिणकडे विशेष लक्ष दिले.
किरणने गवंड्याच्या हाताखाली काम करून बारावी परीक्षेत चांगले गुण मिळविले. पुणे येथील एका इंजिनिअर कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरसाठी प्रवेश मिळाला.
पुणे येथे जाण्यासाठी प्रवासासाठीही पैसे नव्हते. विद्यार्थी सहाय्यता समितीच्या शिफारसीनुसार डॉ.संजय मालपाणी याचे ट्रस्टने किरणला दहा हजाराचा धनादेश पाठविला तसेच विमल संचेती (पुणे) व पुष्पावती इंगळे यांनी पुस्तके व कपड्याची जबाबदारी उचलली आहे.
ज्यांनी कधी जग, माणसं कधी पाहिली नाहीत अशा अंध मुलांच्या सो कॅन ग्रुपने चक्क किरणला दरमहा मदत करून डोळस कामगिरी केली आहे.